ODI Captain Rohit Sharma: टी-20 कर्णधारपदानंतर रोहित शर्माकडे एकदिवसीय सामन्याचेही नेतृत्व देण्यात आलं आहे. भारतीय संघाच्या निवड समितीने याबाबतची घोषणा केली आहे. निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची निवड केली. यामध्ये एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे. तसेच कसोटी संघाच्या उपकर्णधारपदीही रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन विराट कोहलीला तर कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरुन अजिंक्य रहाणेला पायउतार व्हावं लागलं आहे.  


यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीनं टी-20 चं कर्णधारपद सोडलं होतं. त्याच्या जागी रोहित शर्माची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या मते, टी-20 आणि एकदिवसीय संघाचा एकच कर्णधार असावा. त्यामुळे रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.  2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार आहे, त्याच्या तयारीसाठीही रोहितला वेळ मिळेल. 
 
2017 मध्ये विराट कोहलीकडे भारतीय संघाच्या एकदिवसीय संघाची धुरा सोपण्यात आली होती. 2019 च्या विश्वचषकाच्या तयारीसाठी धोनीनंतर लगेच विराटकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता.  


 






दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेट किपर), वृद्धीमान साहा (विकेट किपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शामी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज


स्टँड बाय प्लेअर - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जान नागव्सल्ला


दुखापतीमुळे यांचा पत्ता कट - रविंद्र जाडेजा, शुबमन गिल, अक्षर पटेल, राहुल चहर