बारबाडोस : टीम इंडियानं (Team India) टी 20 वर्ल्ड कपमधील अभियानाचा समारोप विजेतेपदासह केला. भारतानं (India) यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकाही मॅचमध्ये पराभव स्वीकारला नाही. भारत आणि कॅनडा यांच्यातील मॅच रद्द झाली. आयरलँड, अमेरिका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया,इंग्लंड आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत रोहित शर्माच्या टीम इंडियानं दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवलं. रोहित शर्मानं (Rohit Sharma) गुड बाय म्हणण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली वेळ नसल्याचं म्हटलं. मात्र, रोहित शर्मानं टी 20 वर्ल्ड कपमधून निवृत्त होण्याचा विचार केला नव्हता, असं म्हटलं.
रोहित शर्मा पहिल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेता संघाचा सदस्य, त्यानंतर भारताला विजेतेपद मिळवण्यासाठी नवव्या टी 20 वर्ल्ड कप पर्यंत वाट पाहावी लागली. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांच्यासह नव्या दमाच्या यंग ब्रिगेडसह रोहित शर्मानं राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ बांधला. भारतानं दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकताच विराट कोहलीनं निवृत्तीची घोषणा केली. यानंतर रोहितनं देखील निवृत्तीची घोषणा केली.
रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित शर्मानं मॅच संपल्यानंतर मीडियासोबत बोलताना म्हटलं की मी टी20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार केला नव्हता. पण, परिस्थिती अशी निर्माण झाली की निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती जाहीर करण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली वेळ नव्हती, असं देखील रोहित शर्मानं म्हटलं.
पाहा व्हिडीओ
रोहित शर्मा आयपीएल खेळणार का?
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. टी 20 वर्ल्ड कप जिंकून यशाच्या शिखरावर असताना रोहित शर्मानं आणि विराट कोहलीनं निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. याचवेळी रोहित शर्माला वनडे आणि कसोटीमध्ये खेळणार का? असं विचारण्यात आलं. रोहित शर्मानं कसोटी आणि वनडे मध्ये भारताकडून खेळणार म्हटलं. याशिवाय आयपीएलमध्ये खेळणार का असं विचारलं असता शंभर टक्के खेळणार असल्याचं रोहित शर्मानं म्हटलं.
रोहित शर्माचं स्वप्न पूर्ण
रोहित शर्मानं भारताचं कॅप्टनपद स्वीकारल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम फेरी, वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत टीमनं धडक दिली होती. मात्र, यश हाती लागलं नव्हतं. मायभूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला वनडे वर्ल्ड कपचा पराभव रोहित शर्मासह सर्वांच्या जिव्हारी लागला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या ट्रॉफीवर भारतानं नाव कोरलं.
संबंधित बातम्या :