Yashasvi Jaiswal Dropped 3 Catches : क्रिकेटच्या मैदानावर चपळता खूप महत्त्वाची असते, परंतु काहीवेळा कठोर परिश्रमांव्यतिरिक्त, नशिबाची साथ पण लागते. खेळाडू क्षेत्ररक्षण करताना साधे झेल सोडतात, याचा फायदा विरोधी संघाचे खेळाडू घेतात, असे अनेकदा सामन्यांमध्ये दिसून येते. असेच काहीसे मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात पाहायला मिळाले, जिथे भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल क्षेत्ररक्षण करताना सपशेल अपयशी ठरला.
चौथ्या दिवशी खेळाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत यशस्वी जैस्वालने एकूण 3 झेल सोडले. यशस्वीने प्रथम उस्मान ख्वाजाचा झेल सोडला. यानंतर त्याने मार्नस लॅबुशेन आणि पॅट कमिन्सचाही सोपे झेल घेतला नाही. यानंतर कर्णधार रोहित शर्माचा मैदानातच संयम सुटला आणि तो खूप संतप्त दिसत होता, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच टीम इंडिया पहिल्या डावात 369 धावा करून ऑलआऊट झाली होती, यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पहिला झटका लवकर बसला असता, पण क्षेत्ररक्षण करत असलेल्या यशस्वी जैस्वालने उस्मानचा एक सोपा झेल सोडला आणि त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या फक्त 7 धावा होती आणि ख्वाजा 2 धावा करून फलंदाजी करत होता. येथून ख्वाजाने एकूण 21 धावांची खेळी खेळली.
उस्मान ख्वाजाचा झेल सोडल्यानंतर यशस्वी जैस्वाल चांगले क्षेत्ररक्षण करेल अशी सर्व चाहत्यांना अपेक्षा होती. पण तसे होताना दिसले नाही, ज्यात त्याने मार्नस लॅबुशेनचा झेल सोडला. अशा वेळी ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या 99 अशी होती. त्याचे 6 विकेट्स गमावले होते आणि येथून कांगारू संघाला पुनरागमन करण्याची पूर्ण संधी मिळाली. लॅबुशेनचा झेल सोडला तेव्हा तो 46 च्या वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करत होता, त्यानंतर तो 70 धावांची इनिंग करण्यात यशस्वी झाला. याशिवाय यशस्वी जैस्वालने 21 धावांवर वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करत असताना पॅट कमिन्सचाही झेल सोडला. त्यावेळी जैस्वाल सिली पॉईंटवर क्षेत्ररक्षण करत होता, त्यात चेंडू येण्यापूर्वीच तो उठला आणि बॉल त्याच्या पायांमधून गेला.
जैस्वालच्या क्षेत्ररक्षणावर रोहित संतापला...
एकीकडे मेलबर्नच्या मैदानावर चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर पूर्ण दबाव कायम ठेवला होता, तर दुसरीकडे यशस्वीच्या खराब क्षेत्ररक्षणावर कर्णधार रोहित आणि विराट कोहली या दोघांचाही राग पाहायला मिळाला. जैस्वालने महत्त्वाच्या वेळी लॅबुशेनचा झेल सोडला, तेव्हा कोहलीही त्याच्यासोबत स्लिपमध्ये होता, तो रागात दिसत होता. जैस्वालने कमिन्सचा सिली पॉईंटवर झेल सोडला तेव्हा कर्णधार रोहित बराच वेळ त्याच्याकडे बघत राहिला.
हे ही वाचा -