Rohit Agarkar On KL Rahul And Riknu Singh : टी 20 वर्ल्डकपसंदर्भात कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विश्वचषकासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. विश्वचषकाच्या संघात केएल राहुल याला स्थान न दिल्यामुळे चर्चा सुरु होत्या. याबाबत अजित आगरकर यांनी स्पष्टच शब्दात भूमिका सांगितलं. मंगळवारी टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यांची घोषणा कऱण्यात आली होती. यामध्ये केएल राहुल, रिंकू सिंह, शुभमन गिल यासारख्या स्टार खेळाडूंची वर्णी लागली नाही. त्यावरुन बीसीसीआयवर टीकास्त्र सोडलं गेलं. याबाबत आज अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी उत्तरं दिली. दरम्यान,केएल राहुल आयपीएल 2024 मध्ये 10 सामन्यात 40 पेक्षा जास्तच्या सरासरीने 406 धावांचा पाऊस पाडलाय.  
 
ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना विश्वचषकासाठी विकेटकीपर म्हणून टीम इंडियात संधी दिली. राहुल याचा पत्ता कट झाला. पण त्यानंतर मात्र जोरदार चर्चा सुरु झाली. अभिनेता रितेश देशमुख यानेही केएल राहुलसाठी ट्वीट केले होते. राहुलची निवड का झाली नाही? याबाबत आगरकरनं सांगितलं. तो म्हणाला की, केएल राहुल शानदार फलंदाज आहे. पण आम्हाला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची गरज होती. केएल राहुल आयपीएलमध्ये टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करत आहे. कोणत्या स्लॉटमध्ये कोणता खेळाडू हवा, त्यावरच खेळाडूची निवड करण्यात आली. मधल्या षटकात केएल राहुलपेक्षा पंत आणि संजू यांची कामगिरी चांगली आहे. दुसऱ्या हापमध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन जबाबदारीनं फलंदाजी करतील, त्यामुळे त्यांची निवड झाली. 






रिंकू सिंहची निवड का नाही ?


रिंकू सिंह याच्याबाबत खूप विचार झाला. त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय कठीण होता. त्यानं कोणतीही चूक केली नाही. पण कॉम्बिनशन महत्वाचं आहे. त्याआधारावरच संघाची निवड कऱण्यात आली. संघाला एका अतिरिक्त गोलंदाजाची गरज होती. त्यामुळेच रिंकूची निवड झाली नाही. त्याला राखीव खेळाडूमध्ये ठेवण्यात आली आहे.