India Legends vs England Legends : पुढील महिन्यात टी20 विश्वचषक (T20 Cricket) खेळवला जाणार आहे. नुकतीच आशिया कप स्पर्धाही पार पडली. आता कोणतीही जागतिक स्पर्धा सुरु नसली तरी जागतिक क्रिकेटमधील माजी दिग्गज क्रिकेटर सध्या मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. एकीकडे भारताची लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा सुरु असून दुसरीकडे रोड वर्ल्ड सेफ्टी सिरीज (Road Safety World Series) स्पर्धा सुरु आहे. आज या स्पर्धेत सचिन तेंडुलकर असणारी इंडिया लीजेंड्स (India Legends) आपला चौथा सामना इंग्लंड लीजेंड्स (England Legends) संघाविरुद्ध खेळणार आहे. 


आज सामना खेळणाऱ्या इंडिया लीजेंड्स संघाने आपला पहिला सामना जिंकला असून मागील दोन सामने अनिर्णीत सुटले होते. दुसरीकडे इंग्लंड लीजेंड्स संघाने आपले तीन पैकी दोन सामने गमावले असून त्यांचा एक सामना अनिर्णीत सुटला आहे. इंडिया लीजेंड्स संघात सचिनसोबत युवराज सिंह, सुरेश रैना आणि इरफान पठाणसारखे दिग्गज मैदानात उतरतील. तर इंग्लंड संघाचा कर्णधार इयान बेल असून मॅट प्रायर, टिम ब्रेसनन आणि निक कॉम्प्टनसारखे दिग्गज मैदानात उतरतील.


कधी, कुठे पाहाल सामना?


रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा आजचा 14 वा सामना (22 सप्टेंबर) डेहराडूनच्या राजीव गांधी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल.  साणना भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलीकास्ट सिनेप्लेक्स आणि स्पोर्ट्स-18 चॅनलवर पाहता येणार आहे. तसंच सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग Voot वर पाहता येईल.


कसे आहेत दोन्ही संघ?


इंडिया लीजेंड्स


सचिन तेंडुलकर (कर्णधार), सुरेश रैना, युवराज सिंह, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंह, मुनफ पटेल, सुब्रमण्यम बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, नमन ओझा, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, राजेश पंवार आणि राहुल शर्मा.


इंग्लंड लीजेंड्स 


इयान बेल (कर्णधार), माल लोये, डेरेन मॅडी, दिमित्री मास्करेहांस, ख्रिस शॉफिल्ड, क्रिस ट्रेमलेट, मॅट प्रायर, फिल मस्टर्ड, टिम एंब्रोस, टिम ब्रेसनन, रिकी क्लार्क, निक कॉम्प्टन, जेड डर्नबेच, स्टीफन पॅरी, जेम्स टिंडल.


महत्वाच्या बातम्या :