England Legends vs Sri Lanka Legends : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगाम (Road Safety World Series 2022) सध्या सुरु आहे. जगभरातील माजी दिग्गज क्रिकेटर या स्पर्धेत आपआपल्या देशाकडून मैदानात उतरले आहेत.नुकताच इंग्लंड लीजेंड्स विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स (England Legends vs Sri Lanka Legends) हा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने अगदी अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 3 रन देत 4 विकेट्सही घेतल्या ज्यामुळे 7 विकेट्सने श्रीलंका लीजेंड्स विजयी झाले. सामन्यात नाणेफेक गमावल्य़ामुळे इंग्लंड लीजेंड्सच्या संघाला प्रथम फलंदाजी करावी लागील. यावेळी ते 19 षटकांत केवळ 78 धावांच करु शकले. ज्यानंतर श्रीलंकेनं तीन गडी गमावत 14.3 षटकात 79 धावा करत सामना सात गडी राखून जिंकला.
सामन्यात श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटर सनथ जयसूर्याने श्रीलंका लीजेंड्ससाठी अगदी घातक गोलंदाजी केली. सनथ जयसूर्याने आपल्या 4 षटकांत केवळ 3 धावा देत इंग्लंडच्या संघाच्या 4 खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यावेळी जयसूर्यानं 2 ओव्हर मेडन टाकल्या. याशिवाय नुवान कुलसेकरा आणि चामारा डी सिल्वा यांना 2-2 विकेट्स मिळाले. तर इशारू उदाना आणि जीवन मेंडिस यांनी 1-1 विकेट आपल्या नावावर केली. सनथ जयसूर्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या दिग्गज गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजांना धावा काढण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. ज्यामुळे इंग्लंड लीजेंड्सचा डाव 19 षटकांत 78 धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून सर्वाधिक म्हणजे सलामीवीर मस्टर्ड आणि बेल यांनी अनुक्रमे 14 आणि 15 धावा केल्या.
इंग्लंड लीजेंड्सच्या 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका लीजेंड्स संघाने 14.3 षटकात 3 गडी गमावत 79 धावा करत सामना जिंकला. श्रीलंकेच्या दिलशान मुनवीराने 43 चेंडूत 24 तर कर्णधार तिलकरत्ने दिलशानने 21 चेंडूत 15 धावा केल्या. याशिवाय उपुल थरंगाने 19 चेंडूत 23 धावा केल्या. त्याचवेळी जीवन मेंडिस 4 चेंडूत 8 धावा करून नाबाद राहिला. इंग्लंड लीजेंड्सकडून स्टीफन पॅरी, ख्रिस स्कोफिल्ड आणि दिमित्री मास्करेनहॉस यांनी 1-1 विकेट घेतली.
हे देखील वाचा-