Rishabh Pant : भारतीय संघाचा (Team India) स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) डिसेंबर 2022 मध्ये कार अपघतात गंभीर जखमी झाला. या अपघातात ऋषभ पंत थोडक्यात बचावला असला तरी त्याची दुखापत गंभीर असल्यानं तो आता दीर्घकाळासाठी विश्रांतीवर आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला गंभीर दुखापत झाली असून सध्या तो विश्रांती करत असून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचं दिसून येतं. दरम्यान सध्या पंतचं एक ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्वीटनंतर चाहते ऋषभ पंतचं खूप कौतुक करताना दिसत आहेत. तर हे ट्वीच म्हणजे ऋषभ पंतनं त्याच्या अधिकृत ट्वीटरवरुन एका 6 वर्षाच्या फॅनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


'तुम्हाला अयानला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आवडेल का?' 





तर अयान नावाच्या 6 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस नुकताच झाला. त्यानंतर अयानच्या वडिलांनी ऋषभ पंतला ट्वीटरवर टॅग करत एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, ऋषभ पंत, आशा आहे की तू बरा झाला आहेस... माझा मुलगा अयान तुझा मोठा फॅन आहे, तो एक उत्तम खेळाडू तसेच तुझ्यासारखा डावखुरा फलंदाज आहे. त्याला तुझ्यासारखं व्हायचं आहे. त्याने पुढे लिहिले की, 30 डिसेंबरला तुमचा अपघात झाला होता, त्यानंतर अयान तुमच्यासाठी सतत प्रार्थना करत आहे… त्याने पुढे लिहिले की, आज तो 6 वर्षांचा झाला आहे, तू अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देशील का? 






ऋषभ पंतचा रिप्लाय  


या ट्वीटनंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने या ट्वीटला उत्तर देत अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ऋषभ पंतने कमेंटमध्ये लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा अयान... भविष्यासाठी शुभेच्छा... आता हे ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया युजर्स ऋषभ पंतचं कौतुक करत आहेत. याशिवाय चाहते या ट्वीटवर सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.






हे देखील वाचा-