Rishabh Pant Viral Video Duleep Trophy 2024 : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. सध्या ऋषभ पंत दुलीप ट्रॉफी खेळत आहे. भारत ब कडून खेळणाऱ्या पंतने भारत अ विरुद्धच्या दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी केली. 


मात्र, त्याच्या फलंदाजी आणि किपिंगशिवाय पंत इतर काही कारणांमुळे देखील प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पंत चर्चेत येण्याचे कारण दुसरे आहे, ज्यामुळे तुम्हीही हसू आवरू शकणार नाही.  


पंतचा व्हिडिओ होतोय व्हायरल


दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये भारत अ आणि भारत ब यांच्यातील चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारत अ संघाचा कर्णधार शुभमन गिल आपल्या संघातील खेळाडूंशी बोलत होता. त्यावेळी दुसऱ्या संघातील ऋषभ पंतही त्यात सामील झाला. त्याला कोणीही रोखले नाही, ऋषभ पंत हा भारताच्या बी संघाचा भाग आहे आणि तो त्याच्या प्रतिस्पर्धी संघाची प्लॅनिंग ऐकत आहे. बीसीसीआय डोमेस्टिकने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यावर चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.






पंतची शानदार खेळी 


बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून ऋषभ पंतचे टीम इंडियात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. दुलीप ट्रॉफीतील त्याच्या कामगिरीवर निवड समितीचे बारीक लक्ष आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात पंतने नक्कीच निराश केले, पण दुसऱ्या डावात त्याने अप्रतिम फलंदाजी केली. 


भारत अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत फलंदाजीला आला तेव्हा त्याच्या संघाने केवळ 22 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. येथून पंतने आपल्या नैसर्गिक शैलीत फलंदाजी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. पंतने अवघ्या 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे.


हे ही वाचा -


IND vs BAN Test Squad : राहुल बाहेर, पंतला संधी? बांगलादेशविरुद्ध उद्या होणार टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या कोणाला मिळणार स्थान?


Shubman Gill : कधी सारा तेंडुलकर तर कधी सारा अली खान, टीम इंडियाच्या 'प्रिन्स' शुभमनचं 'या' 4 मुलींशी जोडलं गेलं नाव पण...


Akash Deep Duleep Trophy : बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी बिहारच्या लालची कमाल! घेतल्या 9 विकेट, BCCI देणार संधी?