India Squad For Bangladesh Series : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आता मिळाल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती उद्या संघाची घोषणा करणार आहे.
दरम्यान, टीम इंडियाचे खेळाडू दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये खेळत आहेत. खेळाडूंची कामगिरी पाहूनच संघ निवडला जाईल. टीम इंडिया ऋषभ पंतला संधी देऊ शकते. पंतने अनेक प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे. भारत ब संघासाठी त्याने अर्धशतकही झळकावले. केएल राहुलही दावेदार आहे. पण त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
टीम इंडियाने ऋषभ पंतला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संधी दिली होती. पंतने टी-20 सामन्यात 49 धावा केल्या होत्या. मात्र यानंतर विशेष काही करता आले नाही. मात्र तो आता दुलीप ट्रॉफीमध्ये चमकला आहे. भारत अ आणि भारत ब यांच्यातील सामन्यात पंतने 47 चेंडूंचा सामना करत 61 धावा केल्या. त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. पहिल्या डावात केवळ 7 धावा करून पंत बाद झाला.
केएल राहुलही टीम इंडियात सहभागी होण्याचा दावेदार आहे. राहुलने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 30 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. दुलीप ट्रॉफीमध्ये पण त्याची कामगिरी काही खास राहिली नाही. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती आत्मविश्वास दाखवू शकते. पंतसह अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनाही संधी मिळू शकते.
बांगलादेशविरुद्ध भारताचा संभाव्य कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान.
हे ही वाचा -