Rishabh Pant Health Update : तीन आठवड्यांपूर्वी कार अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत (Rishabh Pant) लवकरच मैदानात परतण्याची शक्यता आहे. लेटेस्ट हेल्थ अपडेटनुसार, दोन आठवड्याच्या आत त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो. दरम्यान, डिस्चार्ज मिळाला तरी, ऋषभ पंतला मैदानात परतण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
कार अपघातात (Car Accident) ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर आणखी एक शस्त्रक्रिया होणार असून ती शस्त्रक्रिया सुमारे सहा आठवड्यांनी होणार होती. पण आता ऋषभला तिसऱ्या शस्त्रक्रियेची गरज भासणार नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच, त्याच्या प्रकृतीतील सुधारणा पाहता त्याला येत्या दोन आठवड्यातच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
TOI च्या वृत्तात बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत म्हटलंय की, "ऋषभ पंतच्या गुडघ्याचे लिगामेंट्स फाटले होते. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, मेडिअल कोलॅटरल लिगामेंटची (MCL) शस्त्रक्रिया अत्यंत आवश्यक होती. आता पोस्टरियर क्रूसिएट लिगामेंटच्या (PCL) स्थितीवर पुढच्या दोन आठवडे लक्ष ठेवलं जाईल. त्यानंतरच आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार की, नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. लिगामेंट्स सहसा सहा चार ते सहा आठवड्यांत स्वतःच बरे होतात. यानंतरही पंतला काही दिवस एक्सरसाईजसोबतच आराम करावा लागणार आहे."
मैदानातील कमबॅकसाठी आणखी काही काळ पाहावी लागणार वाट
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतला दोन आठवड्यांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. यानंतर बीसीसीआयकडून त्याचा रिहॅब चार्ट तयार केला जाईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "तो किती दिवसांत मैदानात परतू शकेल, याबाबत अद्याप स्पष्ट काहीच सांगता येणार नाही. पंतला माहित आहे की, त्याला काऊन्सलिंग सत्रातूनही जावं लागेल. अशा परिस्थितीत त्याला मैदानात परतण्यासाठी आणखी 4 ते 6 महिने लागू शकतात."
अपघातानंतर गाडीबाहेर कसा पडला ऋषभ?
ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर त्याला घटनास्थळावरुन स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतील पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ऋषभने एका पोलीस अधिकाऱ्याला सांगितले की, तो गाडीतून कसा बाहेर पडला हे काहीही त्याला आठवत नाही. मीडिया रिपोर्टनुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त देहात स्वप्ना किशोर सिंह यांनी एका वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे. ऋषभने पोलिसांना सांगितलं की, ऋषभ गाडीतून कसा उतरला? याबाबत त्याला काहीही आठवत नाही. ऋषभ इतका ट्रॉमामध्ये होता की त्याला काहीच आठवत नव्हते.