Rishabh Pant Car Accident Video: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारचा सकाळी भीषण अपघात (Rishabh Pant Accident) झालाय... या अपघातामध्ये ऋषभ पंत थोडक्यात बचावला आहे. या भीषण अपघातात ऋषभ जखमी झाला असून त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या देहरादूनमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कार जळून खाक झाली आहे. दिल्लीहून देहरादूनला जाताना हम्मदपूरजवळ हा अपघात झाला... कार चालवताना ऋषभ पंतला (Rishabh Pant Accident) झोप लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गाडी अतिशय वेगात होती, गाडीवरील ताबा सुटल्यानंतर ती डिव्हायरला धडकली. त्यानंतर गाडीनं पेट घेतला. ऋषभ पंतने स्वत:चा बचाव करत गाडीतून बाहेर निघाला. अपघाताच्या वेळी ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता आणि पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची खिडकी तोडली. त्यानंतर उपस्थित असणाऱ्यांनी तात्काळ ऋषभ पंतची (Rishabh Pant Accident) मदत करत रुग्णालयात दाखल केलं. या भीषण अपघातामध्ये ऋषभ पंत थोडक्यात बचावला. या अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत....






दरम्यान गरज पडल्यास ऋषभ पंतला दिल्लीला एअरलिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती देहरादूनच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष आणि अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांनी ऋषभच्या आईशी फोनवर संपर्क साधून विचारपूस केली आहे. बीसीसीआय ऋषभ पंतच्या संपर्कात असून उपचारावर लक्ष ठेवून आहेत. बीसीसीआयने ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. 






बीसीसीआयनं काय म्हटलं?


"भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी उत्तराखंडमधील रुरकीजवळ कार अपघात झाला. त्याला सक्शम हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी अँड ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. या अपघातात ऋषभच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत. त्याच्या उजव्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे.उजव्या मनगटाला, घोट्याला, पायाच्या बोटालाही दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खरचटलं असून आहे. दरम्यान त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच्या दुखापतींचे प्रमाण आणि पुढील उपचारांसाठी येथे एमआरआय स्कॅन केले जाणार आहे."