Rishabh Pant Accident : टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला भीषण (Rishabh Pant Car Accident) अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत जखमी झाला आहे. ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात
दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत. ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
गाडी चालवताना डुलकी लागल्याने अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. गाडी चालवताना डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. ऋषभ पंत गाडीत एकटाच होता. अपघात झाल्यानंतर गाडीला आग लागली. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. ऋषभ पंतला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऋषभची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. ऋषभ दिल्लीहून उत्तराखंडमध्ये आपल्या रुडकी येथील घरी येत होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली.
पाहा व्हिडीओ : ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात
ऋषभच्या मदतीसाठी धावले धामी
ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला आहे. उत्तराखंडमधील रुडकीजवळ ही घटना घडली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे सांगितले आहे.
गरज पडल्या पंतला एअरलिफ्ट करणार
कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या मदतीसाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पुढे आले आहेत. पंतच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच, गरज पडल्यास ऋषभला एअरलिफ्ट केले जाईल. सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. ऋषभ पंतच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असंही धामी यांनी सांगितलं आहे.