Rishabh Pant Angry on Umpire : भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भारतीय संघ आणि पंचांमध्ये चेंडूवरून गरमागरमी पाहायला मिळाली. भारतीय खेळाडू, विशेषतः ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज चेंडू खराब झाल्यामुळे नाराज होते आणि त्यांनी पंचांना तो बदलण्याची मागणी केली, परंतु पंचांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.
पंतने रागाच्या भरात पंचांसमोर केलं 'हे' कृत्य
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या डावादरम्यान भारतीय संघाने चेंडू खराब झाल्यामुळे प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, चेंडूचा आकार बिघडला होता. 61 व्या षटकात, यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने चेंडू पंचांकडे नेला आणि त्याची तपासणी करण्याची मागणी केली. पंचांनी गेज (मापन यंत्र) वापरून चेंडू तपासला आणि चेंडू गेजमधून सहजपणे गेला, नियमांनुसार याचा अर्थ चेंडू ठीक होता. पण पंत या निर्णयावर समाधानी दिसत नव्हता आणि रागाच्या भरात मैदानावर चेंडू फेकताना दिसला, ज्यामुळे मैदानावर थोडासा तणाव निर्माण झाला.
हा वाद इथेच संपला नाही. दोन षटकांनंतर 63 व्या षटकात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही चेंडूच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पंचांना तो बदलण्याची विनंती केली. पंचांनी पुन्हा एकदा गेजने चेंडू तपासला आणि यावेळीही नियमांनुसार चेंडू योग्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे पंचांनी चेंडू बदलण्यास नकार दिला, ज्यामुळे भारतीय संघात निराशा स्पष्टपणे दिसून आली. यावेळी जसप्रीत बुमराह देखील पंचांशी बोलताना दिसला, परंतु पंचांनी त्याचा निर्णय बदलला नाही. ही घटना आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
75 व्या षटकात मिळाला दुसरा चेंडू
पण, काही षटकांनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची ही मागणी मान्य करण्यात आली. चेंडूची स्थिती खराब असल्याने, पंचांनी 74 व्या षटकानंतर चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. नवीन चेंडू मिळण्यापूर्वी हा निर्णय 6 षटकांत घेण्यात आला. कसोटी सामन्यात प्रत्येक संघाला 80 षटके टाकल्यानंतर एक नवीन चेंडू दिला जातो.
हे ही वाचा -