England vs India 1st Test Day 2 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघासाठी अत्यंत संस्मरणीय ठरला. 20 जुलै रोजी झालेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः भंबेरी उडवली. यशस्वी जैस्वालने नेहमीप्रमाणे आक्रमक शैलीत फलंदाजी करताना शतक ठोकले. नवा कर्णधार शुभमन गिलने जबाबदारीने खेळ करत आपले शतक साजरे केले. दोघांमधील शतकी भागीदारीने भारताचा डाव भक्कम पायावर उभा राहिला. यात भर टाकली ती ऋषभ पंतने...

Continues below advertisement






ऋषभ पंतने साहेबांची अक्षरशः भंबेरी उडवली!  


इंग्लंड क्रिकेट संघ आणि भारतीय क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने शानदार शतकी खेळी खेळली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 7 वे शतक आणि इंग्लंडविरुद्ध चौथे शतक होते. त्याने इंग्लंडच्या भूमीवर तिसरे शतक झळकावले आहे. पंत आता भारतासाठी सर्वाधिक शतके (7) करणारा विकेटकीपर फलंदाज बनला आहे. त्याने महेंद्रसिंग धोनी (6 शतके) चा विक्रम मोडला आहे. ऋद्धिमान साहा (3 शतके) तिसऱ्या स्थानावर आहे. 






99 वर षटकार ठोकून शतक, कोलांटी उडी मारुन सेलिब्रेशन


पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने त्याच्या शैलीत फलंदाजी केली आणि 146 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. 99 धावांवर असताना कोणतही दडपण न घेता, त्याने पुढे सरसावत षटकार ठोकत शतक पूर्ण केलं. आणि त्यानंतर जे घडलं, त्याने संपूर्ण मैदानात जल्लोष उसळला. पंतने शतक साजरं करताना मैदानात कोलांटी उडी मारली, आणि चेहऱ्यावरची जिद्द, आत्मविश्वास आणि समाधान स्पष्टपणे झळकत होतं. ड्रेसिंग रूममधून टीममधील सहकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत उभं राहून त्याचा गौरव केला.


इंग्लंडच्या विरोधात पंतचा कहर...


पंतने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्याने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत आणि 22 डावांमध्ये 42 पेक्षा जास्त सरासरीने 850 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 4 शतकांव्यतिरिक्त, 4 अर्धशतके देखील त्याच्या बॅटमधून आली आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 146 धावा आहे. पंतने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक धावा केल्या आहेत.