Ricky Ponting Viral Video :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्वचषकाची फायनल रंगणार आहे. रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या तगड्या संघामध्ये फाईट होणार आहे. तब्बल 48 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जगाला विश्वविजेता मिळणार आहे. जिकडे तिकडे याचीच चर्चा सुरु आहे. अशातच आता शरद पवारांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने शरद पवारांचा अपमान केला होता. हा व्हिडीओ 2006 मधील आहे, त्यावेळी शरद पवार आयसीसीचे अध्यक्ष होते. रिकी पाँटिंगने कॅमेऱ्यासमोरच पवारांचा अपमान केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतोय. ऑस्ट्रेलियाकडून बदला घेण्याची वेळ आली, असे म्हणत नेटकरी हा व्हिडीओ पोस्ट करत आहेत.


व्हिडीओ नेमका कधीचा? 
2006 च्या चॅम्पियन चषकावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले होते. त्यावेळी आयसीसीचे अध्यक्ष असणारे शरद पवार बक्षीस वितरणाला हजर होते. शरद पवारांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला चषक दिला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाने जल्लोष केला. पण त्याचवेळी स्टेजवरच असणाऱ्या शरद पवारांचा पाँटिंगने अपमान केला. 


पाँटिंगने पवारांचा केला अपमान - 


2006 चॅम्पियन्स ट्रॉफीवर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. चषक देण्यासाठी आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी रिकी पाँटिंगने पवारांच्या हातून ट्रॉफी हिसकावली. इतकेच नाही त... शरद पवारांना स्टेजवरुन जा... म्हणत हाताने सारले... हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 



बदल घ्या ---


भारतीय संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचल्यानंतर पवारांचा तोच जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झालाय. शरद पवारांच्या अपमानाचा बदला घ्या.. असा मेसेजही व्हिडीओसोबत फिरत आहे. ऑस्ट्रेलियाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. रोहित शर्मा आणि टीम इंडियाने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा, असा मेसेज फिरतोय. 


पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ - 


 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्वचषकाची फायनल होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या रणांगणात हे दोन संघ भिडणार आहे. भारतीय संघाने लागोपाठ दहा विजय मिळवत फायनलमध्ये थाटात प्रवेश केला. तर दुसरीकडे सुरुवात खराब झालेल्या ऑस्ट्रेलियानेही लागोपाठ आठ सामन्यात विजय मिळवत फायनल गाठली. 
 


लाखभर चाहते येणार -


अहमदाबाद स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी जवळपास लाखभर चाहते येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्टेडियम आणि शहरात मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. अहमदाबाद स्टेडियममध्ये एक लाख 32 हराज प्रेक्षकांची क्षमता आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणारा महामुकाबला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होणार आहे.