Jasprit Bumrah completes 100 wickets in SENA countries: इंग्लड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात बुमराहनं सेना देशांत 100 कसोटी विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. या कामगिरीसह जसप्रीत बुमराहनं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम आक्रमला मागं टाकलंय. अक्रम यांनी 28 वर्ष 230 व्या दिवशी सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड 100 कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. तर, बुमराहने वयाच्या 28 वर्ष 211व्या दिवशी हा विक्रम रचला आहे.

जसप्रीत बुमराहनं 47 डावात सेना देशांत 100 विकेट्स घेतले. तर, श्रीलंकेचा दिग्गज मुथया मुरलीधरन या यादीत अव्वल स्थानी आहे. मुरलीधरननं फक्त 28 डावांत सेना देशात 100 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. 

सेना देशांत जसप्रीत बुमराहच्या कसोटीमधील विकेट्स-

विरोधी संघ विकेट्स
इंग्लंड 37
ऑस्ट्रेलिया 32
दक्षिण आफ्रिका 26
न्यूझीलंड 8

 

सेना देशांत कसोटीमध्ये कमी डावांत 100 विकेट्स घेणारे खेळाडू- 

क्रमांक गोलंदाज डाव
1 मुथया मुरलीधरन (श्रीलंका) 28
2 वसीन आक्रम (पाकिस्तान) 32
3 इमरान खान (पाकिस्तान) 39
4 जहीर खान (भारत) 44
5 जसप्रीत बुमराह (भारत) 47

हे देखील वाचा-