मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या पर्वाच्या आधीच बंगळुरूच्या म्हणजेच RCB च्या संघाकडून 10 खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. असं असलं तरीही संघातील अतिशय महत्त्वाचा खेळाडू एबी डिविलियर्स मात्र संघासोबत कायम असणार आहे. यासोबतच आपीएलमध्ये 100 कोटींची कमाई करणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीत त्यानं अग्रस्थान मिळवलं आहे. त्याच्यापूर्वी चार भारतीय खेळाडूंनीही 100 कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडला आहे.


आयपीएलच्या नव्या पर्वाचा करार मिळण्यासोबतच डीविलियर्स सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली, मुंबई ईंडियंसचा कर्णधार रोहित शर्मा या खेळाडूंच्या लीगमध्ये सहभागी झाला आहे. रैना, धोनी, विराट, रोहित हे असे चार भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी आतापर्यंत 100 कोटींची कमाई केली आहे.


IPL च्या एका पर्वासाठी आरसीबीच्या संघाकडून डिविलियर्सला तब्बल 11 कोटी रुपये इतकं मानधन दिलं जातं. ज्या बळावर त्यानं आतापर्यंत तब्बल 102.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.


सर्वाधिक यशस्वी फलंदाजांच्या यादीत एबीडी


IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात एबीडी सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक ठरला आहे. आतापर्यंत त्यानं 169 सामन्यांमध्ये 40 हून अधिक सरासरीनं 4849 धावा केल्या आहे. यामध्ये त्यानं 38 अर्धशतकं आणि 3 शतकं ठोकली आहेत. ख्रिस गेल या खेळाडूनंतर सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही त्याचं नाव समाविष्ट आहे.


आयपीएलचं 2020 मधील पर्वही एबीडीसाठी दमदार ठरलं होतं. मागील वर्षी 158.74 च्या स्ट्राईक रेटनं 454 धावा केल्या होत्या. डिविलयर्सची ही सर्व कामगिरी लक्षवेधी असली तरीही आतापर्यंत तो सहभागी असणाऱ्या संघाला एकदाही आयपीएलचं जेतेपद मिळालेलं नाही.