IND vs BAN, World Cup 2023, Pune Match :  पुण्याच्या मैदानात टीम इंडियाने बांगलादेशच्या टायगरला 256 धावांत रोखले. भारतीय संघाची गोलंदाजी तर प्रभावी झालीच, पण फिल्डिंगनेही सर्वांची मने जिंकली. केएल राहुल आणि रविंद्र जाडेजा यांनी अफलातून झेल घेतले. दोघांच्या झेलची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही नेटकऱ्यांनी या दोन्ही झेलची तुलना करण्यास सुरुवात केली आहे. राहुलने विकेटच्या मागे हवेत उंचावत झेल घेतला. तर रविंद्र जाडेजाने उजव्या बाजूला हवेत झेप घेत झेल घेतला. हे दोन्ही झेल अप्रतिम होते. यापैकी एका झेलची निवड करणं, तसे कठीण आहे. केएल राहुल आणि जाडेजा यांच्या झेलची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 



सर जाडेजाचा अप्रतिम झेल - 


43 व्या षटकात रविंद्र जाडेजा याने अप्रतिम झेल घेतला. बुमराहच्या चेंडूवर एम रहीम याने जोरदार फटका मारला. हा चेंडू आणि चौकाराच्या मध्ये सर रविंद्र जाडेजा होता. जाडेजाने हवेत उंचावत झेल घेतला. रहीमची खेळी 38 धावांत संपुष्टात आली. जाडेजाच्या झेलचे सध्या सर्वत्र कौतुक होतेय.


पाहा जाडेजाचा अप्रतिम झेल - 







केएल राहुलचा अफलातून झेल -


के एल राहुलने (KL Rahul catch) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सुपरमॅनसारखा झेल घेतला.  विकेटकीपिंग करणाऱ्या के एल राहुलने आपल्या डाव्या बाजूने झेप घेऊन अप्रतिम झेल घेतला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर के एल राहुने हा झेल टिपत, बांगलादेशला तिसरा धक्का दिला. राहुलने घेतलेल्या या कॅचमुळे बांगलादेशचा मेहदी हसन अवघ्या 3 धावा करुन माघारी परतला. के एल राहुलने घेतलेल्या या अप्रतिम झेलमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी कौतुक केलं. दुसरीकडे के एल राहुलने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाला. सोशल मीडियावरही के एल राहुलच्या या व्हिडीओचं कौतुक होत आहे. 


केएल राहुलने घेतलेला झेल पाहा ?







भारताला विजयासाठी 257 धावांची गरज - 
चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली. भारताच्या माऱ्यापुढे बांगलादेशने निर्धारित 50 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 256 धावांपर्यंत मजल मारली. सलमी फलंदाज लिटन दास याने 66 तर टी हसन याने 51 धावांची खेळी केली. त्याशिवाय अखेरीस महमुदल्लाह  याने 46 धावांचे महत्वाचे योगदान दिले. भारताकडून रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.  सलग चौथ्या विजयासाठी भारताला 257 धावांचे आव्हान आहे.