IND vs SA, 2nd ODI Toss Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना पार पडत असून नुकतीच नाणेफेक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा काहीसा वेगळा निर्णय घेतला आहे. वेगळा कारण सहसा नाणेफेक जिंकणारे संघ आधी गोलंदाजी करुन नंतर निर्धारीत लक्ष्य चेस करण्यापासून प्रतिस्पर्धी संघाला रोखत असतात. दुसऱ्या इनिंगमध्ये दवही पडल्याचं दिसून येत असतं. असं असतानाही दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार टेम्बा आज संघात नसून केशव महाराज कर्णधार आहे. त्याने आजची विकेट फलंदाजीसाठी चांगली दिसत असल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. 

 

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 9 धावांनी गमवत मालिकेत 1-0 ची पिछाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधू शकतो. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने आजचा सामना जिंकल्यास ते मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली. दोघांसाठी आजचा सामना अटीतटीचा असल्याने आज एक रंगतदार सामना पाहायला मिळू शकतो.

 

कसे आहेत दोन्ही संघ?

 

दोन्ही संघानी आज संघात प्रत्येकी दोन बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा संघात नसून केशव महाराज कर्णधार आहे. दरम्यान टेम्बा बावुमा आणि तबरेज शम्सी या दोघांना ठिक वाटत नसल्याने आज ते सामन्यात नसून रीझा हेंड्रिक्स आणि ब्योर्न फॉर्च्युइन यांना संधी मिळाली आहे. दुसरीकडे दीपक चाहर दुखापतीमुळे दौऱ्याबाहेर गेल्यानंतर भारतीय संघात आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला टीम इंडियात जागा मिळाली असून शाहबाज अहमदही संघात आहे. रवी बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड यांना विश्रांती दिली गेली आहे.
 


कसे आहेत दोन्ही संघ?

 

भारतीय संघ -




शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर.




दक्षिण आफ्रिका संघ - जनेमान मलान, क्विंटन डी कॉक, केशव महाराज (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरीक क्लासेन, डेविड मिलर, वेन पारनेल, एनरिक नॉर्टेजे, कागिसो रबाडा आणि ब्योर्न फॉर्च्युइन 






हे देखील वाचा-