Ranji Trophy league : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्यामुळे रणजी स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.  सोमवारी रणजी स्पर्धेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार रणजी स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. रणजी चषकातील  (Ranji trophy 2022)  लीग फेरीचे सामने 16 फेब्रुवारी ते पाच मार्च यादरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. तर उर्वरित स्पर्धा आयपीएलनंतर होणार आहे. अंदाजे, जून महिन्यात बाद फेरीचे सामने होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने नवीन वेळापत्रक जारी केलं आहे. 


भारतीय क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा म्हणून रणजी करंडक स्पर्धा ओळखली जाते. पण यंदाच्या रणजी करंडकाचे सामने होण्यावर यंदाही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 13 जानेवारीपासून रणजी स्पर्धेला सुरुवात होणार होती. पण देशात पुन्हा एका कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रणजी स्पर्धा आणि देशांतर्गत क्रिकेट सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  38 संघांमध्ये रणजी स्पर्धेचा थरार रंगणार आहे.  रणजी स्पर्धेचे सामने अहमदाबाद, कोलकाता, तिरुवनंतपुरम, कटक, चेन्नई, गुवाहाटी, बंगळुरु, हैदराबाद आणि राजकोट येथे खेळवले जाण्याची शक्यता आहे.  


रणजी चषकाचं स्वरुप बीसीसीआयने बदलले आहेत. एका गटात चार संघ असतील असे एकूण आठ गट असतील.  ज्यामध्ये प्लेट गटात सहा संघ असतील. मार्च 2020 मध्ये रणजी चषक स्पर्धा पार पडल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेड बॉल फॉरमॅटमध्ये कोणताही सामना खेळला गेला नाही.    


भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक - 
भारतात रणजी सामन्यांची सुरुवात 1934 सालापासून करण्यात आली. रणजी हे नाव क्रिकेटपट्टू रणजितसिंह यांच्या नावावरुन देण्यात आलं आहे. तेव्हापासून मागील वर्षापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणताही खंड पडला नव्हता. पण कोरोनामुळे पुन्हा एकदा या सामन्यांच्या आयोजनात खंड पडणार आहे. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live