Ranji Trophy 2022 Final: भारतामधील सर्वात मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत 'रणजी ट्रॉफी'चं नाव घेतलं जातं. रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात मुंबई आणि मध्य प्रदेश (Mumbai Vs Madhya Pradesh) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. रणजीच्या इतिहासात मुंबई 41 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर, मध्य प्रदेशनं 1999 नंतर प्रथमच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक दिलीय. महत्वाचे म्हणजे, मध्य प्रदेशच्या संघाला आतापर्यंत एकदाही रणजी ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. 


रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघ सर्वात मजबूत संघापैकी एक आहे. मुंबईनं पहिल्या सेमीफायनलमध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध पहिल्या डावातील विशाल आघडीच्या जोरावर फायनलमध्ये जागा मिळवली. तर, दुसऱ्या सेमीफायनलमध्ये मध्य प्रदेशनं दमदार कामगिरी करत बंगालला पराभूत करून रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिली.


ट्वीट-



ट्वीट-



रणजी ट्रॉफीचा फायनल सामना कुठे होणार?
मुंबई- मध्य प्रदेश यांच्यातील अंतिम सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 


रणजी ट्रॉफीचा फायनल सामना कधी खेळला जाणार?
हा सामना 22 जून रोजी सकाळी 9 वाजता सुरु होणार


रणजी ट्ऱॉफीचा अंतिम सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
मुंबई- मध्य प्रदेश यांच्यातील अंतिम सामना स्टार स्पोर्ट्सवर आणि स्टार स्पोर्ट्स 2 एचडी चॅनलवर प्रसारित केलं जाईल. 


मुंबई- मध्य प्रदेश यांच्यातील लाईव्ह सामना ऑनलाईन पाहता येणार का?
मुंबई- मध्य प्रदेश यांच्यातील लाईव्ह स्ट्रिमिंग डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर पाहता येणार आहे. 


हे देखील वाचा-