Duleep Trophy Final : सेंट्रल झोनने सोमवारी बंगळुरूमध्ये साऊथ झोनवर 6 विकेट्सनी मात करत तब्बल 11 वर्षांनंतर दुलीप ट्रॉफीवर कब्जा मिळवला. एकूणच पाहता, रजत पाटीदारसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले आहे. त्यांनी याआधी किंग विराट कोहलीला जे जमलं ते करुन दाखवलं, म्हणजे त्याने RCB ला आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं होतं आणि आता दुलीप ट्रॉफीत आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला.
सेंट्रल झोनने पटकावलं दुलीप ट्रॉफीचं विजेतेपद
65 धावांचं छोटं लक्ष्य गाठण्यासाठी सेंट्रल झोनच्या फलंदाजांना बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मैदानावर पाचव्या दिवशी साऊथ झोनच्या गोलंदाजांनी परखलं. पण लक्ष्य फार मोठं नसल्यामुळे त्यांनी सहज विजय मिळवला. अक्षय वाडकर (नाबाद 19, 52 चेंडू) आणि पहिल्या डावात शतक झळकावणारा यश राठोड (नाबाद 13, 16 चेंडू) हे क्रीजवर असताना सेंट्रलने 20.3 षटकांत 4 गडी गमावून 66 धावा करत दुलीप ट्रॉफीचं सातवं विजेतेपद पटकावलं.
रजत पाटीदारने सेंट्रल झोनला दुलीप ट्रॉफी जिंकवून दिली
पाटीदारसाठी हे वर्षातील दुसरं विजेतेपद ठरलं. याआधी त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्यामुळे स्वाभाविकच ते खूप आनंदी होते. पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनमध्ये पाटीदार म्हणाला, "प्रत्येक कर्णधाराला ट्रॉफी जिंकणं आवडतं. पण आमच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम जिद्द दाखवली आणि मी त्याबद्दल खूप खूश आहे. इथली विकेट थोडी कोरडी होती, त्यामुळे आम्ही आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डॅनिश आणि यशसाठी मला विशेष आनंद आहे, कारण त्यांनी संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त फलंदाजी केली."
दुलीप ट्रॉफी इतिहास
सेंट्रल झोन सातव्यांदा विजेता ठरला आहे. भारतीय क्रिकेटचं केंद्र मुंबई राहिलं असून मुंबई वेस्ट झोनमध्ये येत असल्यामुळे वेस्ट झोनला दुलीप ट्रॉफीत मोठा फायदा झाला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक 19 वेळा वेस्ट झोनने विजेतेपद मिळवलं आहे. सुरुवातीचे चारही हंगाम वेस्टने जिंकले होते. नॉर्थ झोन 18 वेळा विजेता ठरला आहे, तर सेंट्रल झोन आता सातव्यांदा चॅम्पियन बनला आहे.
हे ही वाचा -