Pakistan Players Angry After Ind vs Pak Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रंग दाखवू लागले आहेत. ग्रुप ए मधील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी (India beat Pakistan Asia Cup 2025) राखून पराभव केला. या लढतीत भारतीय संघासमोर पाकिस्तानी संघ सपशेल नांग्या टाकल्या. फलंदाजी असो वा गोलंदाजी दोन्ही भागात पाकिस्तानने लवकरच शस्त्रं टाकली. पाकिस्तान संघाच्या या खराब कामगिरीबद्दल पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू मात्र संतापले. माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका केली, तर शोएब अख्तर, वसीम अक्रम यांनीही पाक खेळाडूंच्या कामगिरीवर निशाणा साधला.

शोएब मलिक काय म्हणाला? (What say Shoaib Malik?)

आशिया कपदरम्यान एका टीव्ही शोमध्ये बोलताना शोएब मलिक म्हणाला की, "आपल्या खेळाडूंना शालेय मुलांसारखं बनवू नका. त्यांचं विचारविश्व उघडं ठेवा. मैदानाबाहेरच्या लोकांसोबत त्यांना राहू द्या. आपण फक्त ‘टॅलेंट’वरच भर देतो, पण ते पुरेसं नाही. इतर देशांत टॅलेंटला व्यवस्थित घडवलं जातं, आपल्या कडे मात्र तसं होत नाही. आपल्याला खेळाडूंना एक व्यासपीठ द्यायला हवं आणि त्यात सातत्य ठेवायला हवं. पण आपल्या देशात दरवर्षी घरगुती स्पर्धांची रचना बदलते. मग स्थिरता कुठून येणार? ती येणारच नाही."

हस्तांदोलन प्रकरणावरून पाकिस्तानात वादंग (India vs Pakistan Asia Cup match handshake controversy)

पाकिस्तानी संघाच्या पराभवानंतर "हँडशेक"वरूनही पाकिस्तानात मोठं राजकारण रंगलं आहे. माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि राशिद लतीफ भारतीय खेळाडूंनी सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात न मिळवल्यामुळे दुखावले गेले आहेत. शोएब अख्तर म्हणाला की, "भारतीय संघाने खेळात राजकारण आणू नये. भांडणं होत राहतात, पण खेळभावना टिकून राहिली तर तेच योग्य ठरेल."

तर राशिद लतीफ यांनी टीव्ही स्टुडिओत नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "भारतीय संघाने हात न मिळवणं योग्य नाही. यावर आयसीसी आणि एसीसीने कारवाई करायला हवी. पाकिस्तानी खेळाडू हात मिळवण्यासाठी थांबले होते, पण भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव थांबलेच नाहीत आणि थेट ड्रेसिंग रूमकडे निघून गेले."

वसीम अक्रम भडकला... (What say Wasim Akram?) 

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमनेही आपले मत मांडले आहे. आणि पाकिस्तानचे अनुभवी फलंदाज कर्णधार सलमान अली आगा आणि मोहम्मद हरिस यांच्यावर स्ट्राइक रोटेट न करता आल्यामुळे कडक टीका केली. अक्रम म्हणाला, 'पाकिस्तानने त्यांच्या डावात 63 डॉट बॉल खेळले. हे 10 षटकांपेक्षा जास्त डॉट बॉल आहेत. याचे श्रेय भारतीय गोलंदाजांना जाते. हसन नवाज, हरिस आणि आमचा कर्णधार यांसारखे खेळाडू पाहून वाईट वाटते. ते प्रतिभावान खेळाडू आहेत. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय (India beat Pakistan Asia Cup 2025)

दुबईमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने 20 षटकांत नऊ गडी गमावून 127 धावा केल्या. पाककडून साहिबजादा फरहान सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 90.90 च्या स्ट्राईक रेटने 44 चेंडूत 40 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याच्याशिवाय खालच्या फळीत फलंदाजी करणाऱ्या शाहीन आफ्रिदीने 16 चेंडूत नाबाद 33 धावांचे योगदान दिले. उर्वरित फलंदाज नेहमीच भारतीय गोलंदाजांसमोर धावांसाठी संघर्ष करताना दिसले. 

विजयासाठी दिलेले 128 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 15.5 षटकांत तीन गडी गमावून सहज साध्य केले. तिसऱ्या फळीत फलंदाजी करणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत 47 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याच्याशिवाय तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी 31-31 धावांचे योगदान दिले.

हे ही वाचा -

Shoaib Akhtar Ind vs Pak No Shake Hands Asia Cup 2025: टीम इंडियाने हस्तांदोलन टाळले, पाकिस्तानला मिरची झोंबली, शोएब अख्तर नेमकं काय म्हणाला?