India U19 Squad for Australia Multi Format Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बहु-फॉरमॅट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडचा या संघात समावेश करण्यात आला आहे. खरंतर, समितचा भारताच्या अंडर-19 संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय अंडर-19 संघाला ऑस्ट्रेलियन अंडर-19 संघाविरुद्ध एकदिवसीय आणि चार दिवसीय सामने खेळायचे आहेत. या दोन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी समितला टीम इंडियात संधी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-19 मालिका 21 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
ज्युनियर निवड समितीने ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्धच्या आगामी बहु-स्वरूप IDFC FIRST बँक घरच्या मालिकेसाठी भारताच्या अंडर-19 संघाची निवड केली आहे. या मालिकेत पुद्दुचेरी आणि चेन्नईमध्ये तीन 50 षटकांचे सामने आणि दोन चार दिवसीय सामने खेळवले जातील. ज्यामध्ये यूपीचा स्टार फलंदाज मोहम्मद अमानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. चार दिवसांच्या या मालिकेत मध्य प्रदेशचा सोहम पटवर्धन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
समितबद्दल बोलायचं झालं तर, 18 वर्षीय अष्टपैलू खेळाडू सध्या सुरू असलेल्या महाराजा टी-20 KSCA स्पर्धेत शानदार षटकार मारल्यामुळे चर्चेत होता. म्हैसूर वॉरियर्सकडून खेळताना त्याने सात सामन्यांत 82 धावा केल्या आहेत, ज्यापैकी गुलबर्गा मिस्टिक्सविरुद्ध 33 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. गेल्या वर्षी स्ट्रेस फ्रॅक्चर झालेल्या समित द्रविडने भारताच्या अंडर-19 देशांतर्गत स्पर्धा विनू मांकड आणि कूचबिहारमध्ये चांगली कामगिरी केली. विनू मांकड ट्रॉफीमध्ये समितने चार डावात 122 धावा केल्या, ज्यात 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. दरम्यान, त्याने बॅट आणि बॉल दोन्हीसह महत्त्वाची भूमिका बजावली आणि कर्नाटकला कूचबिहार ट्रॉफी जिंकण्यात मदत केली. समितने आठ सामन्यांत तीन पन्नास पेक्षा जास्त धावा करून 362 धावा केल्या आणि 19.31 च्या सरासरीने 16 विकेटही घेतल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-19 संघ : रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक) , समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत आणि मोहम्मद अनन.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार दिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-19 संघ : वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशी सिंग पंगालिया (यष्टीरक्षक), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग आणि मोहम्मद अनन.