Rahul Dravid On KL Rahul : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी मालिकेतील पहिला सामना मंगळवारी होणार आहे. 26 डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेलातील पहिलाच सामना ऐतिहासिक असेल. 26 डिसेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु होणारा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हटले जाते. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल?  भारतीय प्लेइंग इलेव्हनबाबत सातत्याने अंदाज वर्तवला जातोय. विकेटकिपर म्हणून कुणाला संधी मिळेल?  केएल राहुलशिवाय केएस भरतही विकेटकिपर म्हणून दावेदार आहे. राहुल द्रविड याने पहिल्या कसोटीत कोण विकेटकिपर असेल, याबाबतची हिंट दिली आहे.  पहिल्या कसोटी सामन्यासाठी केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये केएस भरतपेक्षा प्राधान्य मिळेल, असा अंदाज वर्तवला जातोय..


राहुल द्रविडने केएल राहुलबद्दल काय सांगितलं?


कोच राहुल द्रविड याची आज पत्रकार परिषद झाली. तो म्हणाला की, केएल राहुलला त्याच्या कसोटी फॉरमॅटमधील विकेटकिपिंगबद्दल आत्मविश्वास आहे. कसोटीत विकेटकीपिंग हे मजेदार आव्हान आहे. पण केएल राहुलसाठी ही मोठी संधी असेल. कारण, ईशान किशन सध्या संघाचा भाग नाही, पण तरीही आपल्याकडे विकेटकिपिंगचे चांगले पर्याय आहेत. केएल राहुलला त्याच्या विकेटकिपिंगबाबत आत्मविश्वास आहे.  पण त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सतत विकेटकिपिंग केलेली नाही. पण 50 षटकांमध्ये विकेटकिपिंग करण्याचा अनुभव आहे.  


केएल राहुलसाठी विकेटकीपिंग चॅलेंज ?


राहुल द्रविड म्हणाला की, केएल राहुल मागील पाच ते सहा महिन्यांपासून सतत विकेटकिपिंग करत आहे.  पण दक्षिण आफ्रिकेत फिरकीच्या तुलनेत चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर वेगाने येतो. त्यामुळे केएल राहुलचं काम नक्कीच सोपे होणार आहे, कारण येथील खेळपट्टीवर चेंडू फारसा फिरणार नाही. केएल राहुलसारखा पर्याय असणारे आपल्यासाठी शानदार आहे.. जो विकेटकिपिंगशिवाय शानदार फलंदाजीही करु शकतो. दरम्यान, कोच राहुल द्रविडच्या वक्तव्यानंतर पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल विकेटकिपिंग करता दिसेल, असा कयास लावला जातोय. म्हणजेच, केएस भरत याला बेंचवरच बसावे लागेल. 


कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया -


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, यशस्वी जायसवाल, अभिमन्यू ईश्वरन, रवि अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. 


आफ्रिकेचा संघ - 


टेंबा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोर्जी, डीन एल्गर, एडन मार्करम, कीगन पीटरसन, मार्को यानसेन, वियान मुल्डर, डेविड बेडिंघम, ट्रेस्टन स्टब्स, काइल वॅरेनी, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्जी, केशव महाराज, लुंगी नगिदी आणि कगिसो रबाडा.