R Ashwin Retirement: भारताचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Aswin Retirement) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आर अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 700 हून अधिक विकेट्स घेतल्या. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आली आहे. सध्या खेळवण्यात येणारा भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील तिसरा कसोटी सामना आज पावसामुळे रद्द झाल्यानंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.


14 वर्षे, 765 विकेट्स आणि 4394 धावा-


आर अश्विनने 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 सामना खेळताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर आर अश्विनची दिग्गज क्रिकेटपटू म्हणून ओळख झाली. अश्विनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 287 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 765 विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेनंतर सर्वाधिक विकेट घेणारा अश्विने भारतीय गोलंदाज होता. अनिल कुंबळेने कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये 956 विकेट्स घेतल्या होत्या.


अष्टपैलू खेळाडू म्हणूनही अश्विनची ओळख-


अश्विनने अष्टपैलू म्हणूनही आपला ठसा उमटवला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतके आणि 14 अर्धशतकांसह 3,503 धावा केल्या. अश्विन विशेषत: कसोटी दिग्गज म्हणून ओळखला जाईल. अश्विनची ऐतिहासिक कारकीर्द 14 वर्षे चालली, ज्यामध्ये त्याने 765 विकेट्स घेण्यासोबतच 4394 धावाही केल्या. अश्विनच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने 29 धावा करत एक विकेट्स पटकावली होती.


कसोटी क्रिकेटचा दिग्गज आर अश्विन-


38 वर्षीय अश्विन टीम इंडियाकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर एकूण 537 कसोटी विकेट्स आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं टीम इंडियासाठी 37 वेळा एका डावात सर्वाधिक 5 बळी घेतले. तसेच, त्यानं सर्वाधिक प्लेयर ऑफ द सीरीज अवॉर्ड (11 वेळा) आपल्या नावे केले आहेत. यामध्ये अश्विननं मुरलीधरनची बरोबरी केली आहे. फिरकीपटू म्हणून, त्याचा गोलंदाजीचा स्ट्राइक रेट 50.7 (200+ विकेट) आहे, जो आजवरचा सर्वोच्च स्ट्राईक रेट आहे.


अश्विनची कसोटीतील शतकं 


103 रन विरुद्ध वेस्टइंडीज, मुंबई, 2011 
124 रन विरुद्ध वेस्टइंडीज, कोलकाता, 2013 
113 रन विरुद्ध वेस्टइंडीज, नॉर्थ साउंड, 2016 
118 रन विरुद्ध वेस्टइंडीज, सेंट लूसिया, 2016 
106 रन विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2021 
113 रन विरुद्ध बांग्लादेश, चेन्नई, 2024


आर अश्विनची निवृत्तीची घोषणा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलिवदा,VIDEO:



संबंधित बातमी:


R Ashwin : मोठी बातमी! रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, गाबा कसोटीनंतर केली घोषणा


Ind vs Aus 3rd Test : भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी अनिर्णित, पाचव्या दिवशी मुसळधार पावसानंतर घेतला निर्णय मालिका 1-1 अशी बरोबरीत