पुणे : येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुण्यात (Pune) महाराष्ट्र प्रीमियर लीगचे 4 जून पासून आयोजन करण्यात आले असून या मध्ये महाराष्ट्रातील युवा उदयोन्मुख क्रिकेटपटू (Cricket) आपली चुणूक दाखवत आहेत. दिनांक ७ जून रोजी पुणेरी बाप्पा व रायगड रॉयल्स या दोन संघात सामना सुरू होता. या सामन्यात एक विचित्र पद्धतीचा रन आऊट पाहायला मिळाला. फलंदाजाच्या स्ट्राईकवरील स्टंपवर मारलेला चेंडू नॉन स्ट्राईकर च्या स्टंपवर जाऊन नॉन स्ट्राईकर आऊट झाल्याची आगळीवेगळी घटना क्रिकेट विश्वात पाहायला मिळाली. यापूर्वी 2022 च्या एमपीएल सामन्यात आंद्रे रसेलही अशाच प्रकारे आऊट झाला होता.
रायगड रॉयल्सचा सलामीवीर सिद्धेश वीरने रामकृष्ण घोषचा चेंडू लेग साईडकडे खेळला आणि धोकादायक एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, वीरने लगेच ही धाव घेण्यास नकार दिला. कारण, विकेटकीपरने चेंडू पटकन ताब्यात घेतल्याचं त्याने पाहिले. स्ट्राईकवर उभा असलेला वीर धाव घेण्यासाठी पुढे सरकला, परंतु तो लगेच परत आला, तर नॉन-स्ट्राईक एंडवर उभा असलेला हर्ष मोगवीराला क्रीजवर पोहोचता आले नाही. आता वीर धाव घेण्यासाठी पुढे सरकताच, विकेटकीपर सूरज शिंदेने चेंडू फेकला आणि तो थेट स्टंपवर गेला, परंतु वीर क्रीजवर पोहोचल्याने तो धावबाद झाला नाही. मात्र, सूरजने टाकलेला चेंडू विकेटवर आदळला आणि नॉन-स्ट्राईकर एंडवरील स्टंपवर आदळला. आता, नॉन-स्ट्राईकर एंडवर खेळणारा मोगवीराला क्रीजवर वेळत पोहोचता न आल्याने तो धावबाद झाला. विशेष म्हणजे मोगवीराने त्याचे खातेही उघडले नव्हते आणि अशा प्रकारे बाद झाल्याने तो आश्चर्यचकित झाला.
क्रिकेट विश्वात यापूर्एवी अशी घटना घडल्याचा उल्लेख
क्रिकेट सामन्यादरम्यान अशा प्रकारचा रन आउट क्वचितच पाहायला मिळतो. तथापि, टी-20 क्रिकेटमध्ये अशी रन आउटची घटना घडली आहे. बीपीएल 2022 च्या एका सामन्यादरम्यान आंद्रे रसेलसोबतही असेच घडले आणि तोही अशाच प्रकारे रन आउट झाला. या सामन्यादरम्यान देखील एका खेळाडूने केलेला थ्रो एका टोकाच्या स्टंपवर आदळला आणि नंतर नॉन-स्ट्रायकर एंडवर विकेटवर आदळला आणि रसेल आउट झाला. एमसीसी कायदा 38.4 नुसार, अशा प्रकारे आउट होणे योग्य आहे. या नियमानुसार, चेंडू स्टंपवर आदळल्यानंतर, चेंडू थांबेपर्यंत खेळात राहतो तोपर्यंत तो डेड घोषित केला जात नाही.
कोण आहे सूरज शिंदे?
या विचित्र रन आऊटच्या मागे पुणेरी बाप्पा संघाचा उपकर्णधार विकेटकिपर फलंदाज सूरज शिंदे हा आहे. तो या संघाचे एम पी एल मध्ये 3 सिजन पासून प्रतिनिधित्व करत आहे. सूरज हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मूळचा रहिवासी आहे. सध्या तो उंद्री पुणे येथे गेल्या 10 वर्षांपासून प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहे. त्याने आतापर्यंत महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील व 25 वर्षाखालील क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो विकेटकिपींग सोबतच उजव्या हाताने विस्फोटक फलंदाजी देखील करतो. त्याने याच सामन्यात केवळ 12 चेंडूत 40 धावा करत संघाचा स्कोर 202 धावांपर्यत नेला. एमपीएल मधील त्याची कामगिरी पाहता पुढील आयपीएलच्या हंगामात सूरजला संधी मिळू शकते.