Quetta Gladiators vs Islamabad United : पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2023 स्पर्धेत इस्लामाबाद युनायटेडने ग्लॅडिएटर्स युनायटेडचा 63 धावांनी पराभव केला. विकेटकीपर फलंदाज आजम खानच्या विस्फोटक खेळीच्या बळावर इस्लामाबाद युनायटेडने विजय मिळवला. आजम खान याने अवघ्या 42 चेंडूत 97 धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे इस्लामाबाद युनायटेडने निर्धारित 20 षटकात 220 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल ग्लॅडिएटर्स युनायटेड संघ 19.1 षटकात 157 धावांपर्यंत मजल मारु शकला. इस्लामाबादकडून हसन अली आणि Fazalhaq grabbed यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर अबरार आणि शादाब खान यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. ग्लॅडिएटर्सचा पाच सामन्यात हा चौथा पराभव आहे. ग्लॅडिएटर्सचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. पण चार पराभवामुळे ग्लॅडिएटर्सचं स्पर्धेतील आव्हान खडतर झालेय. 


221 धावांचा पाठलाग करताना ग्लॅडिएटर्स युनायटेड संघ 19.1 षटकात 157 धावांत गारद झाला. जेसन रॉय, वील समीद  आणि मार्टिन गप्टील या महत्वाच्या तीन विकेट सुरुवातीला पडल्या. त्यामुळे ग्लॅडिएटर्स युनायटेड संघ अडचीत सापडला होता. पण त्यावेळीच कर्णधार सर्फराज अहमद आि मोहम्मद हाफिज यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 69 धावांची भागिदारी केली. पण 48 धावांवर मोहम्मद हाफिज बाद झाला अन् त्यानंतर एकापाठोपाठ एक बाद होत गेले. सर्फराज अहमद 31 धावांवर बाद झाला. परिणामी ग्लॅडिएटर्स युनायटेड संघाचा डाव 157 धावांवर संपुष्टात आला. 
 
इस्लामाबाद युनायटेड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रहमनुल्लाह गुरबाज आणि  रीस वैन डर डुसेन स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर कर्णधार शादाब खान याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण एकापाठोपाठ एक विकेट पडल्या. पण एका बाजूला विकेटकीपर फलंदाज आजम खान धावांचा पाऊस पडता होत. 43 धावा झाल्या असताना इस्लामाबाद संघाने आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. संघ अडचणीत असताना विकेटकीपर फलंदाज आजम खान याने धावांचा पाऊस पडला. आजम खान याला यावेळी आसिफ अली याची साथ मिळाली. दोघांनी पाचव्या विकेट्ससाठी अवघ्या 45 चेंडूत 98 धावांची भागिदारी केली. याच भागिदारीच्या बळावर  इस्लामाबाद युनायटेड संघाने 200 धावांचा पल्ला पार केला. 


मोहम्मद हस्नेनच्या एकाच षटकात लागोपाठ तीन षटकार  


आसिफ अली बाद झाल्यानंतर आजम खान याने धावगती कमी होऊ दिली नाही. त्याने एकापाठोपाठ एक षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला.  19 व्या षटकात आजम खान याने लागोपाठ तीन षटकार लगावले. हे षटक मोहम्मद हस्नेन फेकत होता. त्याशिवाय अखेरच्या षटकातही आजमने षटकार लगावला. आजमने 9 चौकार आणि 8 षटकार याच्या मदतीने 97 धावांचा पाऊस पडला. अखेरच्या चेंडूवर बाद झाल्यामुळे अजम आपलं शतक झळकावू शकला नाही.


आणखी वाचा :
कांगारुंना घरचा आहेर, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने पॅट कमिन्सला सुनावलं, म्हणाला....