IND vs NZ, 2nd T20 Proabable 11 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज सायंकाळी होणार आहे. तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील हा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Staidium) खेळवला जाणार आहे. सामना जिंकल्यास भारत मालिकाही जिंकेल आणि गमावल्यास मालिकाही गमावेल. तर अशा या निर्णायक सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सलामीला दीर्घकाळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) संधी दिली जाऊ शकते. तसंच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी लक्षात घेता उमरान मलिकलाही प्लेईग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. त्याला युजवेंद्र चहलच्या जागी संघात स्थान मिळू शकते. निर्णायक सामना पाहता भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हे दोन बदल पाहायला मिळू शकतात.


या टी-20 मालिकेत आतापर्यंत भारतीय सलामीच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे सुरुवात केलेली नाही. शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये होता, मात्र टी-20 मालिकेत त्याला तशी कामगिरी करता आलेली नाही. गिलने या मालिकेत आतापर्यंत 11 आणि 7 धावांची इनिंग खेळली आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये झटपट धावा काढण्याची क्षमता पृथ्वी शॉकडे आहे. पृथ्वी शॉला आतापर्यंत केवळ एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली असली, तरी देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याची कामगिरी प्रभावी ठरली आहे. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात त्याला नक्कीच संधी मिळू शकते. गोलंदाजीतील बदलाबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात टीम इंडिया युजवेंद्र चहलच्या जागी उमरान मलिकला खेळण्याची संधी देऊ शकते. मलिक जो अहमदाबादची खेळपट्टी आणि परिस्थिती लक्षात घेता संघासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतो.


दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:


भारत : हार्दिक पांड्या (कर्णधार), पृथ्वी शॉ, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग


न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब टफी, ब्लेअर टिकनर.


कुठे पाहता येणार सामना?


भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


हे देखील वाचा-