IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात टी20 मालिकेतील तिसरा सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 12 धावांनी जिंकला आहे. तर दुसरा सामना भारताने 6 विकेट्सनी जिंकत मालिकेत 1-1 अशी आघाडी घेतली आहे. ज्यामुळे आजचा सामना जो संघ जिंकेल तो मालिकाही जिंकणार आहे. आज होणारा तिसरा टी20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Stadium) खेळवला जात आहे. तर दोन्ही संघासाठी 'करो या मरो'चा हा सामना असल्याने या सामन्यापूर्वी मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे, अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ... 


सामना होणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फलंदाज दमदार कामगिरी करताना दिसून आले आहेत. 6 सामन्यांच्या 12 डावांमध्ये 10 वेळा 150+ धावा केल्या आहेत. यामध्ये, 5 वेळा संघांनी 180+ चा स्कोअर ओलांडला आहे. येथे सर्वोच्च धावसंख्या 224 धावांची आहे. फलंदाजांसाठी फायद्याच्या या विकेटवर 1 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.






कसं आहे अहमदाबादचं हवामान?


सामन्यादरम्यान अहमदाबादचे हवामान क्रिकेट खेळण्यासाठी अगदी योग्य असेल. तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील. पावसाचीही शक्यता नाही. अशा स्थितीत सामना कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल.


अहमदाबादमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा आहे?


अहमदाबादमध्ये आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले गेले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भारतीय संघ मैदानात उतरला आहे. टीम इंडियाने येथे चार सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत.  



न्यूझीलंडविरुद्ध भारताचा टी20 संघ







हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार 


कुठे पाहता येणार सामना?


भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   






महत्त्वाच्या इतर बातम्या :