ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीकडून (ICC) नुकताच ऑक्टोबर महिन्यासाठीचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिला कॅटेगरीमध्ये पाकिस्तानच्या निदा दार (Nida Dar) हिने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे तीन नॉमिनेट खेळाडूंमध्ये दोन भारतीय महिला असून दोघींना पछाडत निदाने विजय मिळवला आहे. भारतीय महिलांमध्ये युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स (Jemimah Rodrigues) आणि स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. याशिवाय पुरुष कॅटेगरीमध्ये विराट कोहलीनं (Virat Kohli) बाजी मारली आहे. 






काही महिन्यांपूर्वीच महिला आशिया चषक (Womens Asia Cup) पार पडला. या स्पर्धेत भारतानं दमदार खेळ दाखवत ट्रॉफी उंचावली. सर्वच महिलांनी चांगला खेळ दाखवला. पण पाकिस्तानच्या निदा दारचा खेळ अप्रतिम होता. तिने 6 सामन्यात 145 धावा ठोकत 8 विकेट्स घेतल्या. तिच्या या स्टार अष्टपैलू खेळीच्या जोरावरच नॉमिनेट करण्यात आलं आणि प्रेक्षकांचीही पसंती मिळाल्यावर तिने पुरस्कार मिळवला आहे. आशिया कपमध्येच भारताची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्जने काही सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. तर अष्टपैलू दीप्ती शर्मा हीने बऱ्याच सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल केली. ज्यामुळे या दोघींना नॉमिनेट करण्यात आलं होतं. पण अखेर प्रेक्षकांनी निदाला पसंती दिल्यामुळे  महिला कॅटेगरीत आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराने निदालाच सन्मानित करण्यात आलं आहे.


काय आहे ICC प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड?


आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसी (ICC) क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये विचार केला तर भारताच्या विराट कोहलीला नॉमिनेट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार सुरु झाल्यानंतर विराट पहिल्यांदाच नॉमिनेट झाला आहे. कारण मागील जवळपास दोन वर्षे विराट खराब फॉर्मात होता आणि त्याच काळात हा पुरस्कार सुरु झाला. ज्यामुळे अद्याप विराट नॉमिनेट झाला नव्हता. आता तो परत फॉर्मात परतल्यामुळे थेट नॉमिनेट झाला आहे. त्याच्या सोबत  झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांचा समावेश आहे. सिकंदर हा तर झिम्बाब्वे संघासाठी कमाल अष्टपैलू खेळी करत आहे. तर मिलरही कमाल फॉर्मात आहे. 


हे देखील वाचा-