Babar Azam Pakistan Cricket : बाबर आझम पुन्हा एकदा पाकिस्तानचा कर्णधार झालाय. शाहीन आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून पुन्हा बाबर आझमकडे धुरा सोपवण्यात आली आहे. जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकात बाबर आझम पाकिस्तान संघाचं कर्णधारपद संभाळणार आहे. पाकिस्तान क्रिकेटची विश्वचषकाची नुकतीच जर्सी लाँच करण्यात आली. पण बाबर आझम वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी अभिनेत्रीनं बाबर आझमची इज्जत काढली आहे. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत बाबर आझमची खिल्ली उडवली आहे. एका नाही दोन अभिनेत्रीनं बाबर आझमची लाज काढली आहे. अभिनेत्रीनं बाबर आझम याला हिरो नव्हते तर अपयशी भावाचा रोल दिलाय.


सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाकिस्तानचा माजी क्रिकेटर रमीज राजा याच्या 'शो टाइम विद रमीज' या शो मधील आहे. रमीज राजा याच्यासोबत एक होस्ट दिसत आहे.  बाबर आझम याला कोणता रोल द्याल, असे या शोमध्ये पाकिस्तानी अभिनेत्रीला विचारला जात आहे. यावर अभिनेत्रीनं कोणताही विचार न करताना बाबर आझमला भावाचा रोल दिला जाईल, असं म्हटलेय. दुसऱ्या अभिनेत्रीने बाबर आझम याला अपयशी भावाचा रोल दिलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  


व्हिडीओच्या सुरुवातीला रमीज राजा यांनी पाकिस्तानच्या अभिनेत्रीला बाबर आझम याच्याबद्दल प्रश्न विचारला. बाबर आझम पाकिस्तानचा कर्णधार आहे, त्याला तुम्ही कोणता रोल द्याल? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अभिनेत्रीनं म्हटले की... भावाचा... अभिनेत्रीच्या उत्तरानंतर दुसरी अभिनेत्री चकीत झाली. त्यावर ती म्हणते की बाबर आझमला तुम्हाला हिरो वाटत नाही का? 


होस्ट कऱणारी अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीला पुन्हा व्यवस्थित प्रश्न विचारते..  एक चित्रपट तयार होत आहे. त्यामध्ये तू प्रमुख अभिनेत्री आहे. तुला हिरो आणि हिरोचा अपयशी भाऊ.. हे निवडायचे आहे. त्यामध्ये बाबर आझमला कोणता रोल देशील. त्यावर अभिनेत्रीनं पुन्हा एकदा अपय़शी भाऊ असेच उत्तर दिले. त्या अभिनेत्रीचं उत्तर ऐकून शोमधील सर्वांनाच हसू आवरले नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी बाबर आझम याची खिल्ली उडवली आहे. 






बाबर आझम पुन्हा एकदा कर्णधार - 


भारतात झालेल्या 2023 वनडे विश्वचषकानंतर बाबर आझमने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं होतं. पण आता टी20 विश्वचषकाआधी बाबर आझम याला पुन्हा एकदा कर्णधारपद सोपवण्यात आलेय. शाहीन शाह आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. बाबर आझम याच्याकडे विश्वचषकाचं कर्णधारपद सोपवण्यात आलेय. मायदेशात न्यूझीलंडविरोधात झालेल्या टी20 मालिकेतून बाबर आझम यानं पुन्हा एकदा पाकिस्तानचं नेतृत्व संभाळलं आहे.