Pakistan Squad, World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंना एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय व्हिसा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) याबाबतची माहिती दिली. पाकिस्तानशिवाय आफगाणिस्तानच्या चमूलाही व्हिसा मिळाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) टीमला हैदराबादला जाण्यास उशीर होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली. त्यानंतर काही तासांतच आयसीसीने व्हिसा जारी केल्याची माहिती दिली.
2016 टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ शेवटचा भारतात आला होता. दोन देशांमधील राजकीय तणावामुळे क्रिकेट संघ फक्त आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. आता पाच ऑक्टोबरपासून होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात येत आहे. १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान याच्यात लढत होणार आहे.
पाकिस्तानचा संघ उद्या, 27 सप्टेंबर रोजी भारतासाठी रवाना होणार आहे. पाकिस्तान संघाच्या नियोजित प्रवासापूर्वी ४८ तास आधीच व्हिसा मिळाला आहे. पाकिस्तान संघ 29 सप्टेंबरला हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर ६ ऑक्टोबरला वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
पाकिस्तान संघाचे विश्वचषकाचे वेळापत्रक -
सहा ऑक्टोबर - नेदरलँड्स - हैदराबाद
10 ऑक्टोबर श्रीलंका - हैदराबाद
१४ ऑक्टोबर - भारत- अहमदाबाद
20 ऑक्टोबर -ऑस्ट्रेलिया - बेंगळुरु
23 ऑक्टोबर -आफगाणिस्तान -चेन्नई
27 ऑक्टोबर -दक्षिण आफ्रिका -चेन्नई
31 ऑक्टोबर - बांगलादेश - कोलकाता
4 नोव्हेंबर - न्यूझीलंड - बेंगळुरु
12 नोव्हेंबर -इंग्लंड कोलकाता
नसीम शाह आऊट, हसन अली याला संधी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी १५ शिलेदारांची घोषणा केली आहे. २२ सप्टेंबर रोजी पीसीबीने ट्वीट करत खेळाडूंची नावे जाहीर केली. दुखापतीमुळे नसीम शाह याला विश्वचषकात खेळता येणार नाही. त्याच्याजाही असन अली याला संधी देण्यात आली आहे. नसीम शाह याला आशिया चषकात दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेलाय. शादाब खान, मोहम्मद नवाज आणि उसामा मीर या तीन फिरकी गोलंदाजांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पाकिस्तानी संघ :
बाबर आजम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, सलमान आगा, शादाब खान (उप-कर्णधार), मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, सऊद शकील, हॅरिस रौफ.