Gautam Gambhir worried about Kapil Dev :  भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल यांचा एक व्हिडीओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. व्हिडीओत  दोन अज्ञात व्यक्ती तोंड बांधून कपिल देव यांना बळजबरीने त्यांना घेऊन जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कपिल देव यांना किडनॅप केलेय का ? अशा चर्चेला उधाण आले आहे.  विद्यमान खासदार आणि भारताचा माजी सलामी फलंदाज गौतम गंभीर याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केलाय.


गंभीरने या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अजून कुणाला हा व्हिडिओ मिळाला आहे का? आशा आहे की, हे खरंच कपिल देव नसावे आणि ते सुखरून असतील.” गंभीरच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.






भारतीय दिग्गज कपिल देव यांच्या अपहरणाचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियार चाहते वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कपिल देव यांचा हा व्हिडिओ एका जाहिरातीचं शूटिंग असल्याचं दिसत आहे, चाहत्यांनी सोशल मीडियावर असंही लिहिलं आहे की, हे एका जाहिरातीचे शूटिंग आहे आणि कपिल देव यांना काहीही झालं नाही.


व्हिडीओत काय ?


व्हिडीओमध्ये कपिल देव यांच्या तोंडाला पट्टी बांधण्यात आल्याचे दिसत आहे. एका जुन्या घरात, मातीच्या फरशीवर वस्तू पडल्या आहेत आणि दोन अज्ञात माणसे कपिल देव यांन बळजबरीने ओढत घेऊन जात आहेत. कपिल देव मागे वळून पाहत आहेत, पण ते व्यक्ती त्यांना खेचून घेतात.


 






दरम्यान, 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. भारताने याआधी दोन वनडे वर्ल्डकपवर नाव कोरलेय. कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 आणि धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला आहे. आता तिसऱ्यांदा चषक आपल्या नावावर करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.


आणखी वाचा :


भारताला पहिले गोल्ड जिंकून देणारा मराठमोळा नेमबाज रुद्रांक्ष पाटील कोण? जाणून घ्या