Usman Shinwari Death Fake News: पाकिस्तानचा क्रिकेटपटू उस्मान शिनवारीचा (Usman Shinwari) मृत्यू झाल्याची बातमी वेगानं परसत आहे. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या बातमीत उस्मान शिनवारीचा लाईव्ह सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. या बातमीचंमागचं सत्य समोर आलं असून उस्मान शिनवारी सुखरूप असल्याची माहिती समोर आलीय. स्वत: उस्मान शिनवारीनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याला काहीही झालं नाही. तसेच सोशल मीडियावर पसवल्या जाणारी बातमी खोटी असल्याचं स्पष्ट केलंय. 


पाकिस्तान कॉर्पोरेट लीग अंतर्गत बर्जर पेंट्स आणि फ्रिजलँड यांच्यात लाहोरमध्ये (25 सप्टेंबर) प्रसिद्ध ज्युबली क्रिकेट मैदानावर खेळला जात होता. या सामन्यादरम्यान, फ्रिजलँडचा फिल्डर श्रेत्ररक्षण करताना अचानक जमनीवर कोसळला.ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात उस्मान शिनवारीचा हृदयविकारच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. यावर उस्मान शिनवारीनं स्पष्टीकरण दिलंय. 


ट्वीट-






 


मृत्युच्या बातमीवर उस्मान शिनवारीचं स्पष्टीकरण
सोशल मीडियावर मृत्यूची बातमी व्हायरल झाल्यानंतर शनिवारीनं ट्विटरद्वारे संतापजनक प्रतिक्रिया दिली. "मी ठीक आहे. माझ्या कुटुंबियांना माझ्या मृत्यूबाबत फोन येत आहेत. वृत्तवाहिनींच्या संदर्भात,कृपया एवढी मोठी बातमी चालवण्यापूर्वी एकदा खात्री करुन घ्या. धन्यवाद" अशा शब्दात शिनवारीनं प्रसारमाध्यमांवर टीका केलीय. 


व्हायरल व्हिडिओ-






 


मृत्यू झालेल्या खेळाडूचंही नाव उस्मान शिनवारी
महत्वाचं म्हणजे, बर्जर पेंट्स आणि फ्रिजलँड यांच्यातील सामन्यादरम्यान मृत्यू झालेल्या खेळाडूचंही नाव उस्मान शिनवारी असल्याचं कळतंय. बर्जर पेंट्सविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना तो अचानक मैदानात कोसळला. ज्यानंतर मैदानातील सर्व खेळाडू त्याच्या दिशेनं धावली. मात्र, काही वेळानंतर त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ही घटना पाकिस्तानमध्ये आणि त्या खेळाडूचं नाव उस्मान शिनवारी असल्यानं  अनेकांचा गोंधळ उडल्याचं दिसून येतय.


हे देखील वाचा-