pakistan cricketers ,The Hundred League Auction Pakistan Players Unsold: द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तान क्रिकेटमधील खेळाडूंच्या इज्जतीचा फालुदा झालाय. द हंड्रेड लीगमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानच्या 50 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं होतं. यामध्ये 45 पुरुष तर 5 महिला खेळाडूंचा समावेश होता. दरम्यान, इमाद वसीम, सैम अय्यूब, शादाब खान, नसीम शाह आणि हसन अली यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असून देखील त्यांना कोणीही विकत घेतलं नाही. त्यामुळे The Hundred League Auction मध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा चांगलाच अपमान झालाय. महिलांमधून आलिया रियाज, फातिमा सना आणि इराम जावेद यांच्यासह पाच खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं होतं, मात्र त्यांनाही कोणी संधी दिलेली नाही.
द हंड्रेड लीगसाठी पार पडला लिलाव
द हंड्रेड लीगच्या मागील सिझनपर्यंत सर्व संघांचा मालकी हक्क इंग्लैंड एंड वेल्स क्रिकेट बोर्डाकडे (ECB) होता. परंतु आगामी हंगामापूर्वी, आयपीएल फ्रँचायझींनी एकूण आठ संघांपैकी 4 संघांमध्ये भागिदारी विकत घेतली आहे. पाकिस्तानी खेळाडूंना लिलावात खरेदीदार न मिळण्यामागे हेही एक मोठे कारण असू शकते. मुंबई इंडियन्सने ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघात 49 टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. लखनौ सुपर जायंट्सने मँचेस्टर ओरिजिनल्समध्ये 70 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. याशिवाय सनरायझर्स हैदराबादचा मालक असलेल्या सन ग्रुपने नॉर्दर्न सुपरचार्जर्सची संपूर्ण मालकी घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने सदर्न ब्रेव्हमध्ये 49 टक्के भागभांडवल़ विकत घेतले आहे.
पाकिस्तानी खेळाडू 2009 पासून आयपीएलमधून बॅन
शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि सोहेल तन्वीरसारखे दिग्गज खेळाडू आयपीएल 2008 मध्ये खेळताना दिसले. पण 2009 नंतर पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएलमधून बंदी घालण्यात आली. पण वसीम अक्रम आणि रमीझ राजासारखे प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये समालोचक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. दरम्यान, SA20 लीगमध्ये देखील सर्व 6 संघांचे मालकी हक्क आयपीएल फ्रँचायजींकडे आहेत, त्या लीगमध्येही पाकिस्तानचा कोणताही खेळाडू खेळत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या