मुंबई : आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये आज पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) संघ आमने-सामने आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणं (PAK vs SL Asia Cup 2023) फार महत्त्वाचं ठरणार आहे. कोलंबोमधील (Colambo) प्रेमदासा क्रिकेट स्टेडिअममध्ये सुपर-4 मधील हा सामना खेळवला जात आहे. पाकिस्तान संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाने या सामन्यात व्यत्यय आणल्यामुळे हा सामना उशिरा सुरु झाला, त्यामुळे सामन्यातील षटकं कमी करण्यात आली आहेत. पावसामुळे हा सामना 50 ऐवजी 45 षटकांचा खेळवला जाणार आहे.


पाकिस्तान की श्रीलंका, अंतिम फेरीत कोण पोहोचणार? 


श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजयी संघ फायनलमध्ये पोहोचेल. टीम इंडियाने आधीच अंतिम फेरीत स्थान मिळवल्याने आजच्या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत भारताविरोधात खेळेल. आशिया चषकातील अंतिम सामना 17 सप्टेंबर 2023 रोजी कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे.






पावसाचं संकट कायम, आजचा सामना रद्द झाला तर...


पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यावर पावसाचं सावट आहे. सामना 4.30 वाजता सुरु होणार होता. मात्र, पाऊस सुरु झाल्याने सामना सुरु होण्यास उशीर झाला. त्यामुळे आता हा सामना उशिरा सुरु झाल्याने ओव्हर कमी करण्यात आल्या आहेत. अद्यापही कोलंबोमध्ये ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अजूनही या सामन्यावर पावसाचं संकट घोंघावत आहे. आजच्या सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात येईल. असे झाल्यास जास्त रन रेट असणारा संघ फायनलमध्ये पोहोचेल. श्रीलंकेचा रन रेट पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. त्यामुळे श्रीलंकेसाठी हे फायदेशीर ठरेल.






 


संबंधित इतर बातम्या : 


Asia Cup 2023 : रोहित-विराटचा ब्रोमान्स! श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कॅच घेतल्यानंतर विराटची रोहितला 'जादू की झप्पी'; पाहा Video