PAK vs NZ Day 1 Stumps: कराचीच्या (Karachi) नॅशनल स्टेडियमवर (National Stadium) पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ड्वेन कॉन्वेच्या (Devon Conway) दमदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं पहिल्या दिवसाखेर सहा विकेट्सच्या मोबदल्यात 309 धावांचा डोंगर उभा केला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली. पण तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं. न्यूझीलंड संघानं तिसऱ्या सत्रात ठराविक अंतरानं विकेट्स गमावल्या.


ट्वीट-






 


ड्वेन कॉन्वेचं दमदार शतक
टॉम लॅथम आणि ड्वेन कॉनवे यांच्याशिवाय मागील सामन्याचा हिरो ठरलेला केन विल्यमसन 36 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर, डेरी मिशेल अवघ्या 3 धावांवर बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा ईश सोधी आणि टॉम ब्लेंडल नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले.टॉम ब्लंडेल 62 चेंडूत 30 धावा तर, ईश सोढीनं 29 चेंडूत  11 धावा केल्या. न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम आणि ड्वेन कॉनवे यांच्यात 134 धावांची सलामी भागीदारी झाली. याशिवाय, केन विल्यमसन आणि ड्वेन कॉन्वे यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी झाली.


पाकिस्तानची गोलंदाजी
या सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज आगा सलाम सर्वाधिक यशस्वी ठरला. त्यानं 20 षटकात 55 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाहनं 16 षटकात 44 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय,  अबरार अहमदला एक विकेट्स मिळवता आली. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित ठरला. या सामन्यात केन विल्यमसननं नाबाद द्विशतक झळकावलं होतं. 


पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन:
अब्दुल्लाह शाफिक, उमान उल हक, शान मसूद, बाबर आझम (कर्णधार), सौद शकील, सर्फराज अहमद (विकेटकिपर), आगा सलमान, हसन अली, नसीम शाह, मीर हामजा, अबरार अहमद.


न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन:
टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकिपर), मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, टिम साउथी (कर्णधार), मॅट हेन्री, एजाज पटेल.


हे देखील वाचा-