Abrar Ahmed Record, PAK vs ENG: इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानकडून (Pakistan vs England) पदार्पण करणाऱ्या अबरार अहमदनं (Abrar Ahmed) दमदार गोलंदाजी केली. या सामन्यात त्यानं इंग्लंडच्या पाच फलंदाजाचा मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत खास क्बलध्ये एन्ट्री केलीय. रावलपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं पहिल्या डावात ताबडतोब फलंदाजी करत 101 षटकात 657 धावा केल्या होत्या. ज्यात इंग्लंडच्या चार फलंदाजांनी शतक झळकावलं. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात याउलट पाहायला मिळालं. अबरार अहमदच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाज लोटांगण घालताना दिसले.


अबरार अहमदची विक्रमी गोलंदाजी
दरम्यान, 24 वर्षीय अबरार अहमदनं कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट्स घेऊन खास विक्रमाला गवसणी घातलीय. तसेच पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेट्स घेणारा पाकिस्तानचा 13वा गोलंदाज ठरलाय. त्यानं मुल्तान कसोटी सामन्यात इंग्लंडच्या टॉपच्या फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानं जॅक क्रॉली (19 धावा), बेन डकेट (63 धावा), ओली पोप (60 धावा), हॅरी ब्रूक (9 धावा) यांना बाद करून इतिहास रचला. 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन:
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), आगा सलमान, सौद शकील, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, झाहिद महमूद, मोहम्मद अली, अबरार अहमद.


इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन:
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (विकेटकिपर), जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), विल जॅक्स, ऑली रॉबिन्सन, जॅक लीच, मार्क वुड, जेम्स अँडरसन.


हे देखील वाचा-