PAK vs ENG 3rd Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर (National Stadium) अखेरचा आणि तिसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार आणि स्टार फंलदाज बाबर आझमनं (Babar Azam) खास विक्रमाला गवसणी घातलीय. त्यानं कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमधील 1000 धावांचा टप्पा ओलांडून पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकचा (Inzamam ul Haq) 17 वर्षांचा जुना विक्रम मोडलाय.


पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बाबर आझमनं उत्कृष्ट 78 धावांची खेळी केली. या कामगिरीसह त्यानं यंदाच्या वर्षातील 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. कॅलेंडर वर्षात 1000 कसोटी धावा करणारा बाबर आझम हा पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे. त्यानं इंझमाम-उल-हकचा विक्रम मोडीत काढला, ज्यानं 2005 मध्ये सात कसोटी सामन्यांत 999 धावा केल्या होत्या.कॅलेंडर वर्षात बाबर आझमनं 8 कसोटी सामन्यात 67.26 च्या सरासरीनं 1009 धावा केल्या आहेत.ज्यात तीन शतक आणि सात अर्धशतकांची नोंद आहे. यादरम्यान 196 त्याची सर्वोत्तम वयैक्तिक धावसंख्या आहे, ज्या त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कराची कसोटी सामन्यात केल्या.


कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारे फलंदाज
यंदाच्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 1098 धावांची नोंद आहे. या यादीत  दक्षिण आफ्रिकेचा उस्मान ख्वाजा आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर बाबर आझम  1009 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.महत्वाचं म्हणजे, बाबर आझमला आणखी एक डाव खेळायचा आहे. ज्यात त्याला जो रूटला मागं टाकण्याची मोठी संधी उपलब्ध झालीय. 


पाकिस्तानचा संघ 2-0 नं पिछाडीवर
दरम्यान, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघानं 2-0 अशी आघाडी घेतलीय. पाकिस्तानच्या संघाला पहिल्या कसोटी सामन्यात 74 धावांनी तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 


ट्वीट-




 


हे देखील वाचा-