Yuzvendra chahal debut : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणजे युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal). आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या चहलने त्याचा दमदार फॉर्म अजूनही कायम ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार सामन्यात त्याने सहा विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच त्याने भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 58 सामन्यात 74 विकेट्स पूर्ण केल्या आहे. भारताकडून टी20 मध्ये केलेली ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी 2016 मध्ये चहलने झिम्बाब्वेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आता सहा वर्षानंतर चहल भारतासाठी टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे
युजवेंद्र चहलने आतापर्यंत 246 टी20 सामन्यात 280 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सचा विचार करता चहलने भारतासाठी 58 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 74 विकेट्स घेतल्या असून आयपीएलमध्ये 131 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत. तर स्थानिक टी20 क्रिकेटमध्येही त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात त्यांनी 17 सामन्यात 19.51 च्या सरासरीने आणि 7.75 च्या इकॉनॉमीने 27 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली. आता या कमाल फॉर्ममुळे चहल आगामी आयसीसी टी20 विश्वचषकातही (ICC T20 WorldCup) सिलेक्ट होऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातील टॉप 5 गोलंदाज
1. युजवेंद्र चहल : 74 विकेट्स
2. जसप्रीत बुमराह: 67 विकेट्स
3. भुवनेश्वर कुमार: 64 विकेट्स
4. आर अश्विन: 61 विकेट्स
5. रवींद्र जाडेजा: 48 विकेट्स
हे देखील वाचा-