ODI World Cup 2023, Sri Lanka Cricket Team : भारतात होणाऱ्या विश्वचषकाआधीच श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू वानंदु हसरंगा दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार आहे. लंका प्रीमियर लीगच्या 2023 हंगामाच्या अखेरीस दुखापत झाली होती. तेव्हापासून तो मैदानावर परतला नाही. आशिया चषकातही हसरंगाची कमी संघाला जाणवली. आता हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. याआधी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघाला मोठे धक्के बसले आहेत. यामध्ये आता श्रीलंका संघाची भर पडली आहे.



एकदिवसीय विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या संघाने अद्याप 15 सदस्यीय संघाची घोषणा केलेली नाही. श्रीलंका बोर्डाकडे 28 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे, त्यामुळे हसरंगाची रिप्लेसमेंट शोधणे सोपे नाही. वानिंदू हसरंगाने संघाला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात मदत करण्यात बॉल आणि बॅटने  महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतामध्ये हसरंगाची फिरकी प्रभावी ठरली असती. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याचे योगदान संघासाठी फायदेशीर ठऱले असते. हसरंगाच अनुपस्थिती हा श्रीलंकेला मोठा धक्का मानला जात आहे. हसरंगाला आता ग्रेड-3 हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्रीलंका 26 सप्टेंबरला भारताला रवाना होऊ शकतो.


पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. तर १९ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना रंगणार आहे. पण प्रत्येक संघातील खेळाडू दुखापतीचा सामना करत आहेत. भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका अन् ऑस्ट्रेलियासारख्या संघाला दुखापतीचा फटका बसू शकतो. विश्वचषकाआधी दुखापतीचा सामना करत असलेल्या खेळाडूंची मोठी यादी आहे. पाहूयात.. 


एर्निक नॉर्खिया दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर


दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज नॉर्खिया दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकला आहे. पाठदुखीमुळे नॉर्खियाला काही काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. 


पाकिस्तानला मोठा धक्का - 



पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडलाय. पाकिस्तानच्या संघात नसीमला स्थान मिळाले नाही. नसीम शाह पाकिस्तानचा आघाडीचा गोलंदाज होता. नसीम शाहच्या अनुपस्थितीचा फटका पाकिस्तानला बसू शकतो. नसीम शाह याच्याऐवजी हसन अली याला स्थान देण्यात आलेय. पाकिस्तानच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत नसीम शाहचा समावेश आहे. मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर गेला आहे. शुक्रवारी पाकिस्तानने संघाची घोषणा केली. नसीम शाह याच्या अनुपस्थितीत संघाने हसन अली याच्यावर विश्वास दाखवला आहे. हसन अलीने जवळपास दीड वर्षाने संघात कमबॅक केलेय. जानेवारी २०२२ मध्ये हसन अली याने अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो पाकिस्तान संघाबाहेरच आहे.  हसन अली याने 60 वनडे सामन्यात 91 विकेट घेतल्या आहेत. 


हे खेळाडू विश्वचषकातून बाहेर-


एनरिक नॉर्खिया : पाठदुखी (दक्षिण अफ्रिका)
सिसंदा मगला: डाव्या गुडघ्याला दुखापत (दक्षिण अफ्रिका)
एबादोत हुसैन: गुडघ्याला दुखापत (बांगलादेश )
नसीम शाह : खांद्याची दुखापत (पाकिस्तान) 
वानिंदु हसरंगा : हॅमस्ट्रिंग (श्रीलंका)


खालील खेळाडू विश्वचषकाआधी दुखापतग्रस्त झाले आहेत. काही खेळाडूंची दुखापत गंभीर आहे. तर काही खेळाडू दुखापतीवर मात करत आहे. पाहूयात संपूर्ण यादी... 


महिश तिक्ष्णा : हॅमस्ट्रिंग  (श्रीलंका)
दुष्मंथा चमीरा : खांद्याची दुखापत (श्रीलंका)
दिलशान मदुशंका :  (श्रीलंका)
नजमुल हुसैन शान्तो : हॅमस्ट्रिंग (बांग्लादेश)
टिम साउदी: अंगठ्याला दुखापत (न्यूझीलँड)
डार्ली मिशेल: बोटाला दुखापत (न्यूझीलंड)
अक्षर पटेल: अंगठ्याला दुखापत  (भारत)
ट्रॅविस हेड : हाताला दुखापत (ऑस्ट्रेलिया)
हॅरिस रौफ - साइड स्ट्रेन (पाकिस्तान)
इमाम उल हक - पाठदुखी (पाकिस्तान)
आदिल रशीद : (इंग्लंड)
मार्क वूड :  (इंग्लंड)
तमीम इकबाल : (बांगलादेश)
तेम्बा बावुमा : हॅमस्ट्रिंग  (दक्षिण अफ्रिका)
मिशेल स्टार्क : ग्रोइन (ऑस्ट्रेलिया)
ग्लेन मॅक्सवेल : घोट्याला दुखापत (ऑस्ट्रेलिया)