England And Australia ODI ODI World Cup 2023 Schedule : वनडे वर्ल्ड कप 2023 च्या शुभारंभाला अवघ्या १२ दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलाय. भारतात क्रिकेटचा महाकुंभ पार पडणार आहे. पाच ऑक्टोबर रोजी गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकाचा भव्य शुभारंभ होणार आहे. याशिवाय या स्पर्धेत सहभागी होणारा ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आधीच उपस्थित आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे विश्वचषकाचे वेळापत्रक कसे आहे, ते जाणून घेऊयात.


इंग्लंड संघाचे वेळापत्रक 


रनसंग्रामातील पहिला सामना पाच ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. यानंतर इंग्लंड संघाचा दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध १० ऑक्टोबरला धर्मशाला, तिसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध १५ ऑक्टोबरला होणार आहे.  दिल्लीत चौथा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. पाचवा सामना श्रीलंकेविरुद्ध २६ ऑक्टोबरला बेंगळुरू येथे होणार आहे. भारताविरुद्ध 26 ऑक्टोबरला सहावा सामना 29 ऑक्टोबरला लखनौमध्ये पार पडणार आहे. सातवा सामना 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबादमध्ये, आठवा सामना 8 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध पुण्यात आणि लीगमधील नववा आणि शेवटचा सामना 11 नोव्हेंबरला कोलकाता येथे पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाईल. 
 
इंग्लंड संघाचे संपूर्ण वेळापत्रक - 


5 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड- अहमदाबाद  
10 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश- धर्मशाला  
15 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध अफगानिस्तान- दिल्ली  
21 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- मुंबई  
26 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका- बेंगळुरु
29 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध भारत- लखनौ  
4 नोव्हेंबर: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया- अहमदाबाद  
8 नोव्हेंबर: इंग्लंड विरुद्ध नेदरलँड- पुणे  
11 नोव्हेंबर: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कोलकाता  


विश्व कपसाठी इंग्लंड संघाचे स्क्वाड 


जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस एटकिंसन, जानी बेयरस्टा, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वूड आणि ख्रिस वोक्स.


ऑस्ट्रेलिया संघाचे संपूर्ण वेळापत्रक - 


विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला सामना भारताविरोधात होणार आहे. चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना 12 ऑक्टोबरला लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर तिसरा सामना 16 ऑक्टोबरला लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध होईल. चौथा सामना 20 ऑक्टोबरला बेंगळुरूमध्ये पाकिस्तानविरुद्ध होईल. २५ ऑक्टोबरला दिल्लीत पाचवा नेदरलँड विरुद्ध होणार आहे. सहावा न्यूझीलंडविरुद्ध २८ ऑक्टोबरला धर्मशाला येथे तर सातवा इंग्लंडविरुद्ध ४ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये लढत होईल. आठवा सामना अफगाणिस्तानविरुद्ध ७ नोव्हेंबरला मुंबईत आणि नववा आणि शेवटचा सामना 11 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध पुण्यात होणार आहे.


ऑस्ट्रेलियाचे संपूर्ण वेळापत्रक


8 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत- चेन्नई  
12 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका- लखनऊ  
16 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका- लखनौ
20 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान- बेंगळुरु
25 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड- दिल्ली  
28 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड- धर्मशाला में 
4 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड- अहमदाबाद में
7 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगानिस्तान- मुंबई में
11 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश- पुणे में. 


विश्व कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचे शिलेदार -


पॅट कमिन्स (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंगलिस, सीन एबॉट, एश्टन एगर, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर, एडम जाम्पा आणि मिशेल स्टार्क.