Shakib Al Hasan Ruled Out From World Cup 2023 : बांगलादेशनं श्रीलंकेवर तीन विकेट्सनी मात करून, वन डे विश्वचषकात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. बांगलादेशने आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली, पण त्यांना मोठा धक्का बसलाय. कर्णधार शाकीब अल हसन दिल्लीतील सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झालाय. शाकीब अल हसन याला श्रीलंकेविरोधातील सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे शाकीब विश्वचषकातून बाहेर गेलाय. बांगलादेश संघाचे विश्वचषकातील आव्हान आधीच संपुष्टात आलेय. त्यात आणखी एक धक्का बसलाय. 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होण्यासाठी बांगलादेशचा संघ लढतोय. पण त्यांचा कर्णधार शाकीब अल हसन याने माघार घेतली आहे. 


दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर शाकीब अल हसन याने अष्टपैलू खेळीचे प्रदर्शन केले. शाकीबने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. शाकीबला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. गोलंदाजीत शाकीबने महत्वाच्या दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर 280 धावांचा पाठलाग करताना शाकीब अल हसन याने 65 चेंडूमध्ये 127 च्या स्ट्राईक रेटने 82 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता.स्पर्धा संपत असताना  शाकीबची कामगिरी सुधारली पण बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर गेलाय. त्यामुळे शेवट गोड करण्यासाठी बागंलादेश संघ मैदानात उतरणार आहे. त्यात आता कर्णधार नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.


रिपोर्ट्सनुसार, फलंदाजी करताना शाकीबच्या बोटाला दुखापत झाली. सामना झाल्यानंतर शाकीब याच्या बोटाचे एक्स रे करण्यात आले. त्यामध्ये फॅक्टर दिसून आलेय. दुखापत गंभीर असल्यामुळे शाकीबला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. 


वर्ल्ड कपमध्ये शाकीबची निराशाजनक कामगिरी - 


श्रीलंकेविरोधातील सामना वगळला तर संपूर्ण विश्वचषकात शाकीबला मोठी कामगिरी करता आली नाही. बांगलादेशच्या कर्णधाराला सात सामन्यात फक्त 186 धावा करता आल्यात. त्याशिवाय गोलंदाजीत फक्त पाच विकेट्स घेतल्यात. बांगलादेशला अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात खेळायचाय. शनिवारी पुण्यात बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आमना सामना होणार आहे. बांगलादेशला स्पर्धेत आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकता आल्यात.


बांगलादेशचा श्रीलंकेवर विजय - 
बांगलादेशनं श्रीलंकेवर तीन विकेट्सनी मात करून, वन डे विश्वचषकात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळं त्या दोन संघांमधला सामना ही निव्वळ औपचारिकता होती. या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशला विजयासाठी 280 धावांचं आव्हान दिलं होतं. नजमल हुसेन शान्तो आणि शाकिब अल हसननं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 169 धावांच्या भागिदारीच्या जोरावर बांगलादेशनं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. शान्तोनं 90 धावांची, तर शाकिबनं 82 धावांची खेळी उभारली. त्याआधी, चरिथ असालंकानं झळकावलेल्या शतकानं श्रीलंकेला सर्व बाद 279 धावांची मजल मारून दिली होती.