NZ vs AUS, T20 WC 2021 Final: अवघ्या जगाचं लक्ष्य लागून राहिलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर 8 विकेट्सनं मात करीत विश्वचषक आपल्या नावावर केलाय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघानं 18.5 षटकातच पूर्ण करून यंदाच्या विश्वचषकाचा खिताब जिंकलाय.


नाणेफेक गमावून न्यूझीलंडकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मार्टिन गप्टिल (35 बॉल 28 धावा), डॅरिल मिशेल (8 बॉल 11 धावा), केन विल्यमसन (48 बॉल 85 धावा), टिम सेफर्ट (6 बॉल 8 धावा), ग्लेन फिलिप्स (17 बॉल 18 धावा), जेम्स नीशमनं 7 बॉल 13 धावा केल्या. ज्यामुळं न्यूझीलंडच्या संघाला 20 षटकात 172 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडनं 3 विकेट्स घेतल्या. तर, अॅडम झम्पाला 1 विकेट्स मिळाली. 


या लक्ष्याला पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून मैदानात उतरलेल्या डेव्हिड वॉर्नर (38 बॉल 53 धावा), अॅरोन फिंच (7 बॉल 5 धावा), मिचेल मार्श (50 बॉल 77 धावा, नाबाद), ग्लेन मॅक्सवेलनं 18 बॉल 28 धावा केल्या. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या संघानं 18.5 षटकातच हा सामना जिंकला आणि यंदाच्या टी-20 विश्वचषकावर नाव आपलं कोरलंय. न्यूझीलंडच्या संघाकडून ट्रेन्ट बोल्टला 2 विकेट्स मिळाल्या. याशिवाय, न्यूझीलंडच्या एकाही गोलंदाजाला विकेट्स घेता आला नाही. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



हे देखील वाचा-