James Anderson Test Wickets : इंग्लंडचा 40 वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने कसोटी क्रमवारीत नुकतेच अव्वल स्थान पटकावले. त्याशिवाय न्यूझीलंडविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत अँडरसन आग ओकणारी गोलंदाजी करत आहे. वयाच्या 40 व्या वर्षी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या अँडरसनचे क्रीडा जगतातून कौतुक केले जात आहे. यात इंग्लंडच्या माजी कर्णधाराचीही भर पडली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार माईक अथर्टन याने अँडरसनचं कौतुक केले आहे. जेम्स अँडरसन याने आपलया करिअरमध्ये जितके बळी घेतलेत, तितक्या विकेट कोणताही वेगवान गोलंदाज घेऊ शकत नाही, असा दावा इंग्लंडचा माजी कर्णधार अथर्टन यांनी केला आहे. 
 
इंग्लंडचा माजी कर्णधार माई अथर्टन यांनी दी टाईम्समद्ये एक लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी अँडरसनचं भरभरून कौतुक केलेय. या लेखात ते म्हणतात की, कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही वेगवान गोलदाजाला जेम्स अँडरसन इतके बळी घेता येणार नाही. क्रिकेटमधील विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, पण जेम्स अँडरसनचा विक्रम मोडणं कठीण आहे. जोपर्यंत कसोटी क्रिकेट खेळले जाईल, तोपर्यंत अँडरसनचा विक्रम कायमच राहिल. स्टुअर्ट ब्रॉड अँडरसनतर विकेट घेण्यात आघाडीवर आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 571 विकेट घेतल्या आहेत. पण तो अधिक क्रिकेट खेळेल असं वाटत नाही. ब्रॉडनंतर टीम साऊथी आहे, ज्याच्या नावावर 355 विकेट आहेत. तो खूप मागे आहे. वयाच्या 40 वर्षांपर्यंत हे दोघेही क्रिकेट खेळतील असं वाटत नाही. त्यामुळे अँडरसनचा विक्रम मोडणं कठीण आहे. वयाच्या 40 व्या वर्षात अँडरसनसारखी गोलंदाजी करणं कठीण आहे. अँडरसन इतके सामने क्वचितच एखादा गोलंदाज खेळेल, असं वाटतं. 
 
जेम्स ॲंडरसन सध्या 179 वा कसोटी सामना खेळत आहे. त्यानेत आतापर्यंत 682 विकेट्स घेतल्या आहेत. आपल्या करिअरमध्ये त्याने आतब्बल 32 वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानावर आहे. तर शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेगवान गोलंदाजात जेम्स अँढरसन पहिल्या क्रमांकावर आहे, तर स्टुअर्ट ब्रॉड 571 विकेस्टसह चौथ्या क्रमांकावर आहे. ग्लेन मॅकग्राच्या नावावर 563 विकेट्स आहेत. 


आणखी वाचा : 


India vs Australia : तिसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला जबरदस्त झटका, Pat Cummins बाहेर, 'या' खेळाडूकडे संघाचं नेतृत्त्व


ICC Test Rankings : वयाच्या 40 व्या वर्षीही जेम्स अँडरसनचं क्रिकेटमध्ये वर्चस्व; ICC कसोटी क्रमवारीत प्रथम स्थानी