Natasa Stankovic: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मॉडेल नताशा स्टँकोविक (Natasa Stankovic) यांचा 18 जुलै 2024 रोजी घटस्फोट झाला होता. हार्दिक आणि नताशाला एक मुलगा आहे. या मुलाचे दोघंही मिळून सांभाळ करताय. दरम्यान, नताशा स्टँकोविकने केलेल्या एका पोस्टमुळे ती पुन्हा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे.
नताशा स्टँकोविक पुन्हा प्रेमात पडली?
नताशा स्टँकोविकने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नताशाने असे काही लिहिले ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 'पुन्हा प्रेमात पडणे चांगले वाटते', असं नताशाने म्हटलं आहे. एवढेच नाही तर नताशाने पोस्टमध्ये ऑफिशियल वॅडीला टॅग देखील केले आहे. नताशाच्या या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे.
नताशा ऑफिशियल वॅडीला डेट करतेय?
नताशाने तिच्या पोस्टमध्ये @officiallyvaddy ला टॅग केले आहे. आता हे अकाऊंट कोणाचे आहे, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. त्याचवेळी, काही दिवसांपासून असेही दावे केले जात होते की हे अभिनेता रणबीर कपूरचे इंस्टाग्राम अकाऊंट आहे, जो लवकरच सोशल मीडियावर अधिकृत एन्ट्री करणार आहे आणि अशा पोस्टद्वारे त्याचे लाँचिंग सुरू आहे. पण याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
कोण आहे नताशा स्टँकोविक?
4 मार्च 1992 रोजी नताशाचा सर्बियामध्ये जन्म झाला. वयाच्या 17 व्या वर्षी तिने नृत्य प्रशिक्षण घेतले आणि मॉडेलिंग सुरू केली. प्रकाश झा यांच्या 'सत्याग्रह' (2013) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केले. त्यानंतर नताशाने वर्ष 2014 मधील 'बिग बॉस सीझन 8' मध्येही सहभाग घेतला होता. त्यानंतर तिने नच बलिए या डान्स रिएल्टी शोच्या 9 व्या सीझनमध्येही सहभाग घेतला होता. 2018 मध्ये नताशा ही बादशाहच्या 'डीजे वाले बाबू' या सुपरहिट गाण्यात अभिनेत्री म्हणूनही दिसली होती. यानंतर नताशाने 'फुक्रे रिटर्न्स' आणि 'झिरो' सारख्या चित्रपटातही काम केले आहे. नताशाने भारतात राहून खूप काम केले आहे पण आता ती सर्बियाला पुन्हा गेली आहे. नताशा ही आता कायमची सर्बियात राहणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे.