Mumbai Police: टी-20 विश्विचषकाच्या इंग्लंड आणि पाकिस्तान (England vs Pakistan) यांच्यातील अंतिम सामन्यावर सट्टेबाजी (Betting) केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलनं पाच जणांना अटक केलीय. हे आरोपी सट्टेबाजीतून कमावलेले पैसे दुबईतील एका गँगस्टरला पाठवत असल्याचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलला संशय आहे.


दरम्यान, धर्मेश ऊर्फ धिरेन रोशन शिवदसानी, गौरव रोशन शिवदसानी, धर्मेश रसीकलाल वोरा, फ्रॉन्सिस ऊर्फ विकी ऍन्थोनी डायस आणि इम्रान अर्शरफ खान अशी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर सट्टेबाजी घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अंतिम सामना रविवारी ऑस्ट्रेलिया येथे झाला. याच सामन्यासाठी दादर येथील एका हॉटेलमध्ये काहीजण सट्टा घेत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.  पोलीसांनी त्या ठिकाणी छापे ठाकून त्यांच्याकडे रोख रक्कम, मोाबइल संच व इतर साहित्य जप्त केले.


चौकशीत महत्वाची माहिती समोर
आरोपी एकाच वेळी सुमारे 18 अॅप्लिकेशन्स किंवा वेबसाईट्सचा वापर करून क्रिकेट बेटिंग करत होते आणि या आरोपींनी गेल्या वर्षभरापासून अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्रिकेटवर बेटिंग करून प्रचंड पैसा कमावला आहे, अशी माहिती तपासात समोर आलीय. 


मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलची पुढील तपासाला सुरुवात
सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार आरोपींनी सट्टेबाजीसाठी वापरत असलेले सिमकार्ड खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला. या प्रकरणात पोलीस अशा लोकांचा शोध घेत आहेत ज्यांनी बेटिंगसाठी 18 बेटिंग अॅप्लिकेशन तयार केले आहेत. या लोकांनी सट्टेबाजीसाठी अनेकांना आपल्या 18 अर्जांचे युजरनेम आणि पासवर्ड दिल्याचेही तपासात उघड झाले असून, ते कोण आहेत, याचा शोध घेण्याचे काम गुन्हे शाखा करत आहे.


सट्टेबाजीतून बक्कळ पैशांची कमाई
या आरोपींनी क्रिकेट सट्टेबाजी करून बक्कळ पैसा कमावला असून एवढी मोठी रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केलीय, असं  मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलच्या सूत्रांनी सांगितलं. अटक करण्यात आलेला एक आरोपी अनेकदा दुबईत येतो, अशीही माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलला मिळाली. आरोपीनं सट्टेबाजीतून कमावलेले पैसे दुबईतील गँगस्टरला पाठविले तर नाही ना? या प्रश्नाचं उत्तर मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेल शोधत आहे.


हे देखील वाचा-