WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) चा पहिला हंगाम यंदा खेळवला जात असून काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठीचा लिलाव पार पडला. या लिलावात (Womens IPL Auction 2023) एकूण 87 खेळाडूंचं नशिब उघडलं. भारतीय खेळाडूंचंच येथे वर्चस्व दिसून आलं. या लिलावात एकूण 57 भारतीय महिला खेळाडूंना खरेदी करण्यात आलं. दरम्यान पुरुषांच्या आयपीएलमधील चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने महिला आयपीएलमध्येही भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला कर्णधार म्हणून खरेदी केलं आहे. दरम्यान आता मुंबई इंडियन्सने आपली निळ्या रंगाची खास जर्सीही सर्वांसमोर आणली आहे.
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रापूर्वी मुंबई इंडियन्सने आपली जर्सी जाहीर केली आहे. मुंबईने एक खास फोटो शेअर करून या जर्सीचे अनावरण केलं आहे. मुंबईची ही जर्सी पुरुष संघाच्या जर्सीसारखीच दिसते. मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी फिकट निळ्या रंगाची आहे. त्याच वेळी, जर्सीच्या दोन्ही बाजूंना गुलाबी रंग देखील दिसतो. ही जर्सी मुंबईच्या चाहत्यांना खूप आवडल्याचं त्यांच्या सोशल मीडिया कमेंट्सवरुन दिसत आहे.
पहिला सामना मुंबई विरुद्ध गुजरात
महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 4 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्या सत्राचा सलामीचा सामना गुजरात आणि मुंबई यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. त्याच वेळी, या लीगचा अंतिम सामना 26 मार्च रोजी बेब्रॉन स्टेडियमवर खेळवला जाईल.
WPL 2023 साठी मुंबई इंडियन्सचा संघ
धारा गुजर, जिंतीमनी कलिता, प्रियांका बाला, हीदर ग्रॅहम, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर, हुमैरा काझी, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, नाटे स्क्राइव्हर, सायका इश्के, इसी वोंग, क्लोए ट्रायन, क्लोए ट्रायव्हन, इश्के.
कुणी किती रुपयाला खरेदी केला संघ ?
महिला प्रीमियर लीगमधील पाच संघासाठी लिलाव काही दिवसांपूर्वी पार पडला. अहमदाबाद संघाला सर्वाधिक बोली लागली होती. अदानी स्पोर्ट्स लाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अहमदाबाद संघाला 1289 कोटी रुपयांत खरेदी केलं. इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबई संघाला 912.99 कोटी रुपयांत खरेदी केलं. महिला आयपीएलमधील तिसऱ्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने खरेदी केलं. आरसीबीने बंगलोरसाठी 901 कोटी रुपये मोजलेत. तर दिल्लीच्या संघाला जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 810 कोटी रुपयांत खरेदी केलं. कापरी ग्लोबल होल्डिंग्स यांनी लखनौच्या महिला संघासाठी 757 कोटी रुपये मोजले आहेत. वुमन्स प्रीमियर लीगमधील पाचही संघाची एकूण किंमत 4669.99 कोटी रुपये इतकी झाली आहे.
हे देखील वाचा-