Mukesh Kumar Career : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या टी 20 मालिका सुरु आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. सहा ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली.  शिखर धवनकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेय तर मुंबईकर श्रेयस अय्यर उपकर्णधार आहे. या मालिकेत रजत पाटीदार आणि मुकेश कुमार यांनाही संधी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळवणारा मुकेश कुमार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागली. सोशल मीडियावर मुकेश कुमारची जोरदार चर्चा सुरु झाली. पाहूयात मुकेश कुमार याच्याबद्दल...

पश्चिम बंगाल संघाचा महत्वाचा सदस्य नेतृत्व -
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुकेश कुमार पश्चिम बंगाल संघातून खेळतो. बंगाल संघाचा तो महत्वाचा सदस्य आहे. 27 वर्षीय मुकेश कुमार उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो. मुकेश कुमारनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधलेय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या तुफानी कामगिरीच्या बळावर त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळालेय. दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी मुकेश कुमारला संघात स्थान मिळालेय. 

मुकेश कुमारने आतापर्यंत 30 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 109 विकेट्स घेतल्या आहेत. मुकेश कुमारने एका डावात पाच वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. तर चार वेळा चार विकेट घेतल्या आहेत.  यादरम्यान मुकेश कुमारची सरासरी  22.50 इतकी आहे तर इकॉनमी 2.75 इतकी राहिली आहे.  

लिस्ट-ए सामन्यात कशी आहे कामगिरी ? - 
मुकेश कुमारने 18 लिस्ट-ए सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 44.00 इतकी राहिली आहे. तर  स्ट्राइक रेट 51 इतका राहिलाय. 17 टी20 सामन्यात मुकेश कुमारने 19 विकेट्स घेतल्या आहेत. टी 20 मध्ये मुकेश कुमारची सरासरी 24.05 आहे तर इकॉनमी 7.25 इतकी आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 6 ऑक्टोबर 2022 लखनौ
दुसरा एकदिवसीय सामना 9 ऑक्टोबर 2022 रांची 
तिसरा एकदिवसीय सामना 11 ऑक्टोबर 2022 दिल्ली